शनिवार, २३ जानेवारी, २०२१

लेक. सासरी जाताना\ शुभ विवाह लेक बापाची लाडाची

लेक सासरी जातांना

पार पडला लग्नाचा
समारंभ सुरळीत
खूश झाले माता पिता
मनातूनी  आनंदित

  क्षण पाठवणीचा तो
  *लेक सासरी जाताना*
   भरुनिया आले मन
  होती मनास  यातना

 जमलेले स्नेही मित्र 
 सारे होती भावनिक
 देणे लेक दुजा हाती
 रीत ती पारंपारिक.

 पाणावल्या नेत्रकडा
 उभे राही बालपण
 बोल बोबडीचे कानी
 आठवले मनी क्षण

जावयाला जड मने 
हात लेकीचा देताना
जड अंतःकरण ते
लेक सासरी जाताना

वैशाली वर्तक       23/1/2021


सोमवार, १९ जून, २०२३

शुभ विवाह

माझी लेखणी साहित्य मंच शहापूर जिल्हा ठाणे
आयोजित काव्य लेखन
विषय .. शुभ विवाह

शुभ विवाह शब्दची
सांगे दोन मनांचे मिलन
करिती संसारास प्रारंभ
बांधूनी पवित्र बंधन

कन्या दानाचे पदरी  पुण्य
मिळविती मायबाप जीवनी
कन्या दोन कुळ उध्दारण्या
तयार आनंदे मनोमनी

शुभ विवाह मांगलिक विधी
होती आप्तेष्ट सारे गोळा
अग्नी देवतेच्या साक्षीने
रंगतो शुभ मंगल सोहळा

येता वेळ पाठवणीची
पाणी डोळ्यांच्या पापण्यांना
आई बाबांचे होई जड मन
लेक लाडकी जातांना 

हासू अन् अश्रूंचा सोहळा 
असे असा शुभ विवाह प्रसंग  
अनुभवताती  सारे जन
मग चढे संसारास रंग

वैशाली वर्तक
अहमदाबाद

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

सरत्या वर्षाने काय दिले

स्वप्न गंध स्पर्धा समूह आयोजित  झटपट काव्यलेखन स्पर्धा  विषय     सरत्या वर्षाने काय दिले  विचार करता मनी  काय मिळाले गत वर्षात  दिले सुख आनं...