काव्य स्पंदन 02 राज्य स्तर स्पर्धे साठी
विषय - गणतंत्र दिन
गणतंत्र दिन
भारत देशाचा
साजरा करीती
जन आनंदाचा
असती विविध
जाती भाषा धर्म
परि समानता
हेच खरे मर्म
लोकांचे लोकांनी
हा संविधनाचा
लोकांसाठी असे
भारत देशाचा
हक्क कर्तव्याची
ठेवती जाणिव
सारे नागरिक
ठेवू न उणिव
देश असे प्रिय
ऐका तिच्या कथा
किती गाऊ तिच्या
गौरवाच्या गाथा
केला आनंदाने
दिन तो साजरा
राष्ट्रीय सणाचा
जल्लोष हसरा
वैशाली वर्तक
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा