अ भा म सा प स्वप्नगंध समूह
उपक्रम- लेख लेखन
विषय -- टेक्नालाॕजी शाप की वरदान
कुठल्याही गोष्टी च्या दोन बाजू असतात. चांगली व वाईट
बाजू. चांगल्या बाजुंचा उपभोग घेत असता ...वाईट वा दुरुपयोग नजरेत येत नाही. तेव्हा सर्व चांगल्याचेच गुणगान करतात.
तसेच या टेक्नाॕलाॕजी चे आहे. सध्याच्या टेक्नाॕलाॕजीने
इतके जीवन सुखकर झाले आहे.व ते अंगवळी पण सहजच पडत आहे.
आताच पहा ना या लाॕकडाऊनच्या काळात मुलांच्या शाळा
त्यांच्या शिक्षणाचे काय ? ...पण या टेक्नाॕलाॕजीने मुलांचे शैक्षणिक तंत्र ... थोडे. उशीरा... पण चालू झाले ...मुले पण हुशारीने नव्या टेक्नाॕलाॕजीत जणु वर्गात शिकत आहे तसे शालेय वर्ग भरुन अभ्यासक्रम पूर्ण करत आहे.
हजोरो मैल दूर वसलेल्या आपल्या मुलांशी ...अगदी त्यांच्या कीचन मधे जाऊन ...आज काय बनविले जेवणास अशा गप्पाकरुन ....क्षणार्धात भेटत आहोत . व दूर रहाण्याचे वा दुराव्याचे दुःख कमी होत आहे. जगातील घडामोडी तर पापणी लवण्याच्या आत समजत आहे. आपले चंद्र यान कुठे पडले हे पण अवनीवरून अवशेषासह पहाता येत आहे.
आपण पहातो जाहिराती त शेतकरी पण उन्हात न जाता घर बसल्या पिकाची विक्री करत आहे .या सा-या गोष्टी टेक्नाॕलाॕजी
मुळेच घडत आहेत .कमी श्रमात काम होत आहे.
तर ह्या सा-या सुखा बरोबर वाईट बाजू असणारच. सतत डोळ्या समोर धरुन... ..मोबाईल काय..... वा काॕम्प्युटर याचे शरीरास थोड्या -फार वा कमी जास्त प्रमाणात अपाय होणारच. तसेच मुलांचे पण सतत मोबाईल वर खेळत रहाण्याने मैदानी खेळापासून ते दुरावले आहेत.
तसेच सर्व सामान्य माणुस हा बघावा तेव्हा नत मस्तक होउन सतत मोबाईल मधे गर्क असतो ....घरातल्यांशी संवाद कमी झाले आहेत ...मोबाईल मधे रमत रहाण्याचे वेड म्हणा वा सवय झाली आहे. आजुबाजुला कोणाशी बोलणे राहिले नाही. जो तो आपल्यातच रमलेला असतो. माणुस घाणा मानव झाला आहे.
बायका पण मोबाईल मधे व्यस्त राहून कधी कधी मुलांच्या गरजाकडे दुर्लक्ष सहजतेने करत आहे.
पण हे सारे मानवाने स्वतः ठरवायचे आहे. स्वतः ला बंधन घालून घेतले पाहिजे ...त्यासाठी टेक्नाॕलाॕजीला दोष देणे ... शाप ठरविणे उचित नाही . पक्वानाचे ताट जरी समोर असले तरी पोट आपले असते ...तसे आपण आपल्यास बंधन घालून टेक्नाॕलाॕजीच्या उपभोग घेतला पाहिजे की वरदान वाटेल
वैशाली वर्तक
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा