सोमवार, १८ जानेवारी, २०२१

टिपूर चांदणे \. चांदण्यांची शाळा

शुभ्र टिपूर चांदणे
..............................
आभाळाच्या गाभा-यात
शाळा असे चांदण्यांची
वाट पहाती सांजवेळी
अस्त होण्या आदित्याची      1


आल्या नभात लाजूनी
 एक एक करुनी हळुवार 
लुकलुक करीत जणू
दिवे लावियले अलवार               2


वाटे घ्याव्या  उचलूनी
भरुनिया ओंजळीत
हळुवार गुंफण्यास
फुले  म्हणूनी  वेणीत             3


जणु भरलीय शाळा
काळ्या काजळ आकाशी
चमचम करी तारे
खेळ खेळण्या चंद्राशी               4

किती दिसती लोभस
तारिकांचे   ते रुप रंग
आकर्षित करी जीवा
 मन होई   पहाण्यात दंग                5


शुभ्र टिपूर चांदणे
मोहाविते जन मना
एक एक तारिका त्या
आकर्षित  क्षणा क्षणा                6
    

चंद्र चांदण्यांचा चाले
खेळ नभी लोभनीय
रुप खुले चंद्रासवे
चांदणीचे रमणीय                      7


चांदण्यांची शाळा
...........................

आभाळाच्या गाभा-यात
भरे शाळा चांदण्यांची
वाट पहाती सांजवेळी
अस्त होण्या आदित्याची

  येती नेभात लाजून
  एक एक हळुवार 
   लुकलुक करी जणू
  दिवे लावी अलवार

   कधी नाही गडबड
    जागा त्यांची ठरलेली
  कोणी कुठे बसायचे
   शिस्त  सदा पाळलेली
   
    शशी येता नभांगणी
    येई शाळेला भरती
    फेर धरूनी शशीला
    लुकलुक चाले भोवती

   येता शरद पूनम
   जणू सोहळा सुंदर 
   दिसे चांदणे टिपूर
   शाळा दिसे मनोहर

  
  चांदण्यांच्या या शाळेचे 
  कळे  तेव्हाची  महत्त्व 
    बंद  शाळाअवसेला
   दावी चांदण्या श्रेठत्व

वैशाली वर्तक

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

सरत्या वर्षाने काय दिले

स्वप्न गंध स्पर्धा समूह आयोजित  झटपट काव्यलेखन स्पर्धा  विषय     सरत्या वर्षाने काय दिले  विचार करता मनी  काय मिळाले गत वर्षात  दिले सुख आनं...