सोमवार, १२ ऑक्टोबर, २०२०

रास खेळुया


सिध्द साहित्यिका समुह आयोजित चित्र काव्य  उपक्रम

**रास खेळुया**

छान सजलीत दोघे
खेळावया  आज रास 
रात्र भर  रंगणार 
गरब्याचा मनी ध्यास

नाचू गाउ धुंद  होउ 
देत ताल टिपरीचा
जणु रंगेल गरबा
 वाटे  तो गोकुळीचा


किती पहाते रोखूनी
डोळे हे जुलमी गडे
 वेड लागेल मजला
नको पाहू  माझ्या कडे

चल सावर ना आता
तव चणियाचा भार
रात्र सरुन जाईल
नाही  आता वेळ फार

आल्या जरी सरी किती
आज रास खेळणार
टिपरीच्या तालावर
रास पहा रंगणार

वैशाली वर्तक

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

कष्टाचे चीज

कष्टाचे चीज      खरच त्यावेळी कापड गिरण्या जोरात चालायच्या.व नोक-या पण  मिळत होत्या.. जे कष्ट करण्यास तयार होते.त्यांना कष्ट करुन खरच शुन्या...