नाचु खेळू
सुट्टी लागताच ती दिवाळीची
गंमत जंमत होते जीवाची धृव पद
नाचुया खेळूया आली दिवाळी
मोद करुया रोजच सकाळी
लुटूया मजा रोज फिरण्याची
गंमत जंमत होई जीवाची 1
पुस्तक पाटीचे नकोच नाव
नाचणे खेळणे एवढे ठाव
करु मौज दिनरात रोजची
गंमत जंमत होई जीवाची 2
खेळू गोट्या पत्ते लगोरी डाव
लाडु चकली वर मारु ताव
किल्ले दावती शान शिवबाची
गंमत जंमत होई जीवाची 3
सुट्टी लागताच ती दिवाळीची
गंमत जंमत होते जीवाची
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा