घरातील पोषक वातावरण लिखाणास
लेखकासाठी घरात पोषक वातावरण
खरच आजचा विषय छान निवडला. आपण सा-या लिहीतो. जमेल तसे रोजचे लिहीण्याचा..... सहभागी होण्याचा प्रयत्न करतो म्हणजे घरात पोषक वातावरण असते असे नव्हे .काही वेळा शक्य होत. त्यावेळच्या परिस्थिती नुसार लिहावयास नाही जमत...तरी आपण वेळ काढून प्रयत्न करतो.
आता लिखाणाची आपणास आवड हे मुळभुत सर्व प्रथम कारण..जी आईतून उतरली .ती शिक्षीका .मला लेखनाची आवड म्हणजे मी साधे सासुबाईंना मुले लहान असतांना (inland)पाठवायची
तर त्या किती खुश व्हायच्या.कारण त्यांच्या मुलांची नातवंडांची सविस्तर खुशाली कळायची. त्या माझे खूप कौतुक करायच्या. हो त्यावेळी फोन नव्हते ना ! सामान्य जनतेपर्यंत प्रचलित.
असो. लिखाण या बाब ला घरात उत्तेजन मिळतच होते. पण खरे लिखाण आता सुरु झाले आहे. ते पण आपल्या या विविध साहित्य समुहाने तर लिखाणातस उधाण आणले आहे .वेळ कमी पडतो. या.... त्या सामुहावर जाण्यात दिवसाचा बराच वेळ जातो. व मी काही इतकी शीध्र कवयित्री नव्हे की लिहून 15/20 मिनीटात मोकळी झाले .त्यामुळे वेळ संबंधा दिवस थोडाफार आराम करत,,, लिखाणात व्यतित होत असतो. पण आता मी तर सर्व जवाबदा-या पार करुन असल्याने तसा घरच्यांना त्रास होत नाही व मी पण ठरलेल्या वेळे पेक्षा जास्त वेळ देत नाही .आपली नैतीक घरची कामे संभाळत लिहीत असते.
तशी मुले बोलत असतात आई काय सबंध दिवस भर टॕब घेउन असते. पण त्यांना त्यांचे काय हवे नको ते मिळत असते .त्यामुळे रोश नसतो ..आणि मी देतेच तेवढा वेळ तर बोलणारच... त्यात पण वावग नाही. आणि आता रोजच लिहीते त्यामुळे रोजचे शक्य होत नाही ..पण पहिले वाचक हेच असतात. कित्येकदा यमक जुळवाण्यात पण मदत करतात.
यांना माझ्या एका अभंगास माझ्या सुनेने स्वरबध्द केले व utub वर
टाकले. तेव्हा तो अभंग त्यांनी ऐकल्यावर माझ्या हून जास्त आनंद त्यांना झाला. आता तर अजून एक अभंगास मुलाने चाल लावली आहे व लवकरच तो पण स्वरबध्द होईल
इतकेच नव्हे तर माझ्या मुलांनी, सुनांनी व मुलीने मिळून "चारोळ्या व कवितेचा संग्रह"
पुण्यास माझ्या अपरोक्ष छापला व मला 70 व्या वाढदिनासा मला हातात दिला नामकरण पण त्यांनी च केले ..मला व यांना याची जरा पण मागमुस न लागु देता
तेव्हा इतके पोषक वातावरण आहे .आणि या सर्वास माझ्या लेखणीस धार देण्यास सर्वच समुहाच्या admin, मेघ मोकाशी सर व समुहावर आणणारी समिधा भाष्टे यांची मी सदा ऋणी आहे. अजून ब-याच सख्याची ऋणी आहे सर्वाची येथे नांवे लिहू शकत विषयाधरुन होणार नाही.
- वैशाली वर्तक.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा