चाहुल मृत्यू ची
मृत्यू शब्दच उच्चारता
जीवाला लागते हुरहुर
माहीत असूनी नक्कीच
विचारांचे दाटे काहूर
जाणार त्याच मार्गावर
जरी जाणतो आपण
दुस-याच्या मृत्यू वर
करीती शोक सारे जन
जीवन जगावे आनंदे
आनंदाने उचलावे पाऊल
जन्माला मरण नक्कीच
जरी लागता मृत्यू ची चाहुल
निसर्ग हेची शिकवे
पहा कलिका उमलणार
न करीता खंत उद्याची
जाणून उद्या कोमेजणार
मानव जन्म मिळाला आपणा
करुया तयाचे सोने सर्वस्वाने
जगुया जीवन सदा आनंदाने
दिधले सुंदर आयुष्य देवाने.
वैशाली वर्तक
मृत्यू शब्दच उच्चारता
जीवाला लागते हुरहुर
माहीत असूनी नक्कीच
विचारांचे दाटे काहूर
जाणार त्याच मार्गावर
जरी जाणतो आपण
दुस-याच्या मृत्यू वर
करीती शोक सारे जन
जीवन जगावे आनंदे
आनंदाने उचलावे पाऊल
जन्माला मरण नक्कीच
जरी लागता मृत्यू ची चाहुल
निसर्ग हेची शिकवे
पहा कलिका उमलणार
न करीता खंत उद्याची
जाणून उद्या कोमेजणार
मानव जन्म मिळाला आपणा
करुया तयाचे सोने सर्वस्वाने
जगुया जीवन सदा आनंदाने
दिधले सुंदर आयुष्य देवाने.
वैशाली वर्तक
मोहरली लेखणी साहित्य समूह
विषय मृत्यू
जगी काहीच नाही निरंतर
नसे कसली शाश्वती
जीवन पण ,असे क्षणभंगुर
करिता विज्ञानाने कितीही प्रगती
किती ही करा प्रयत्न
टिकविण्याची जरी आस
प्रत्येक वस्तूला , व्यक्तीला
नाश हा असतोच खास
उत्पत्ती वाढ आणि अंत
या तीन्ही क्रिया होणार
पण हेच नित्य निरंतर
अमर्त्यची शाश्वती नसणार
जलचरसृष्टी पण नाही निरंतर
ते पण नाही शाश्वत
जो पर्यंत श्वास चाले
जीवन असे अविरत
करा विचार जीवनाचा
क्षण क्षण चालला निसटून
काळ चालला सदैव पुढे
जशी निसटते वाळू हातातुन
आजची सकाळ येत
नाही पुन्हा परतून
आला तो क्षण आनंदाचा
म्हणत उत्साहाने घ्यावे जगून
वैशाली वर्तक
अहमदाबाद
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा