निरोप सरत्या वर्षाला
कोणाचे कोणा वाचून अडे,
सारखा काळ चालला पुढे
अगदी खर कथित आहे .वर्षा मागून वर्ष सरतात ,आणि सरत्या वर्षा दिवशी , म्हणजे
निरोप सरत्या वर्षाला
चालू वर्षाला निरोप देण्याच्या दिवसाचा क्षण येऊन ठेपतो. क्षण भर मन मागे डोकावून पहाते. आठवणी वर्षभराच्या डोळ्यासमोर दोरीचे रीळ उलगडावे तशा उलगडल्या जातात.
आज पण आपल्या सा-यांचे तसेच झाले असणार .वर्ष भराच्या वाईट गोष्टींना विसरुन चांगल्या गोष्टी मनी स्मरुन मन सकारात्मक विचारांनी भरुन घ्यावे जेणे करुन मन प्रफुल्लित होईल व नव उत्साहाने आनंदित होईल .
तसेच माझ्या आठवणी प्रमाणे अथवा मी तरी "मोहरलेली लेखणी" हा समुहा याच वर्षात सहभागी झाले. .समुहाने बरेच नवीन उपक्रम व स्पर्धा घेतल्या गेल्या की जेणे कारणाने लेखणीस घार देण्यात खूप मदत झाली .त्यामुळे आयोजक, संयोजकांचे, आभार व ग्राफिक्स यांनी प्रमाणपत्र (सुंदर ) देउन प्रोत्साहित केले सर्वांचे आभार
हे झाले लिखाण संबंधित ,आता आपल्या देशाने चंद्रावर जाण्याचा (विक्रम )यानने प्रयत्न करुन जगात नाव मिळविले .कौतुकाची बाब .
निसर्गाने म्हणजे वरुण राजाने मात्र हताशा केली .सर्चव सण गणपती, नवरात्री, दिवाळी आणि आता वर्षा अखेर म्हणजे नाताळ ला पण हजरी लावत आहे. त्यामुळे
बळीराजाच्या महेनतीची परीक्षा घेत आहे
असो अशा चांगल्या वाईट घडामोडी चालत 2019 आता सरत आहे. नवीन
वर्षात चांगल्या गोष्टी होतील अशी आशा करुया. तसेच सर्वाना शुभेच्छा. आणि
मी म्हणीन
देऊया हर्षाने ऊत्साहाने
निरोप सरत्या वर्षाला
क्षण आनंदाचे आठवूया
उधाण येईल जगाण्याला
लावूनिया उत्साहाचे अत्तर
नव वर्षाच्या आगमनाला
येउ द्या संकल्पनाना उधाण
दूर सारूनिया नैराश्याला
म्हणत पुन्हा एकदा सर्वांना नूतन वर्षाभिनंदन
वैशाली वर्तक
*सर्व धर्म समभाव साहित्य मंच
आयोजित
उपक्रम काव्यलेखन
विषय . सरत्या वर्षाला
३०/१२/२२
सरत्या वर्षाला निरोप
होते आठवण सरता काळ
वर्षाचा आढावा घेती मनी
काही गोड तर कटु प्रसंग
सहजची येती नजरेला क्षणी
असेच चाले सदा जीवनी
झाल्या चुकांना सुधारूनी
नव्या क्षणाला देत उजळा
अनुभवांची शाळा घेऊ स्मरणी
जरी लक्षण दिसती विषाणूंची
अनुभवाचे सांगू मनोगत
स्वच्छतेने सुंदर राखू पर्यावरण
करू नव्या वर्षाचे सहर्ष स्वागत
देऊया हर्षाने ऊत्साहाने
निरोप सरत्या वर्षाला
क्षण आनंदाचे आठवूया
उधाण येईल जगाण्याला
लावूनिया उत्साहाचे अत्तर
नव वर्षाच्या आगमनाला
येउ द्या संकल्पनाना उधाण
दूर सारूनिया नैराश्याला
वैशाली वर्तक
अहमदाबाद
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा