बुधवार, ८ जानेवारी, २०२०

गोडवा तुझ्या सोबतीचा लेख

गोडवा तुझ्या  सोबतीचा  ...

   सोबत ही माणसास  नेहमीच हवीहवीशी  वाटणारी बाब. .माणूस हा जात्याच सामाजिक प्राणी ..त्याला समाजात रहाणे ...समाजात वावरणे ...हे प्रिय असते. त्याला एकाकी जीवन आवडतच नाही. आदी काळात पण मानव हा  जमातीतच रहायचा. ..टोळक्यातच रहायचा. तर सांगयचे असे की प्रत्येकाला सहवास ...सोबत ही हवीच असते.
     तसेच माझा सोबती जसा माझ्या  आयुष्यात  आला त्याने माझ्या  जीवनात
त्याचे स्थान प्रस्थापित केले. ते इतके झाले..की  मला प्रत्येक  गोष्टीत त्याची मदत लागे.
त्याच्या शब्दांनी  मला मोहवून टाकले. त्याच्या सहवासाची मला ओढ लागली.
व जीवन माझे आनंदी  ..केले. त्याचा सहवास ...सोबत माझा श्वास बनला. जळी स्थळी
मला तोच दिसलेला ...वसलेला वाटतो.
   काय त्याने अशी जादू केली की , मी माझे न राहिले. व त्याच्याच मनात मी  व माझ्या  मनात तो घर करून राहत आहोत. त्याने म्हणजे ...त्याच्या सहवासाने मी सुखी जीवन वाट चालत आहे. याचे कारण त्याच्या सहवासाचा  वा सोबतीचा गोडवा हेच .
     खरच कस असते ना . आधी आई वडील ..नंतर थोडे मोठे झाल्यावर ..मित्र  मैत्रीण   जीवनात येतात. सहवास मिळण्यात तसेच सहवास वा सोबती मिळविण्यात आपण  श्रीमंत  होत जातो  म्हणजे आपले सोबतीचे विश्व वाढत जाते. .हे सारे सोबती आपले इतके अविभाज्य  घटक बनतात. की आपण त्यांच्या शिवाय राहू शकत नाही. तसेच पुढे जीवन साथी आपला सोबती जीवनात गोडवा आणतो. त्याच्या संगतीने
आपण जीवन नौका आनंदात वल्हवतो .  ...तेच माझ्या  सोबतीने मी वर  म्हटले तसे केले. व त्यामुळेच माझे सहजीवन सुखी वाटचाल करत आहे.
     अशा वेळी सहजच गाण्याच्या  ओळी गुणगुणल्या जातात
              देवा दया तुझी ही
              की शुध्द दैव लीला
               लागो न दृष्ट माझी
                माझ्या च वैभवाला (सोबतीला)
    त्यामुळे त्या देवाची परमेश्वराची ....अखंंड साथ त्याचा वरील विश्वास हा पण एक गोडवा असलेला विशेष सोबती आहे नाही का?

वैशाली वर्तक 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

कष्टाचे चीज

कष्टाचे चीज      खरच त्यावेळी कापड गिरण्या जोरात चालायच्या.व नोक-या पण  मिळत होत्या.. जे कष्ट करण्यास तयार होते.त्यांना कष्ट करुन खरच शुन्या...