बुधवार, १३ नोव्हेंबर, २०१९

चादोबा रे चांदोबा

स्पर्धेसाठी
फेरी क्रमांक 4
बालगीत  
विषय ---  चांदोबा रे चांदोबा

चांदोबा  रे चांदोबा
करीत आहे मी विचार
छानसे तुझे सदरे
शिवायचे दोन चार

सदा असतो उघडा
तू असा रे कसा ?
नाही वाजत का थंडी
बघ इकडे असा

जरा स्थिर रहा  ना
कसे घेणार मी माप
ढगा आड जाऊ नको
किती रे तू देतो ताप !

कधी दिसतो रोडावलेला
कधी करी जाडेपणाला मात
नियमित नाहीस का खात ?
तू रोज  रोज वरण भात.

अमावस्येला जातो कुठे
नभात रहातो लपून
दडी मारून बसतोस
अंधारात  आम्हा ठेवून

येणार आहेत लवकरच
शास्त्रज्ञ  यान मधून
त्याच्या करवी देईन
सदरे तुझे  मी पाठवून.

वैशाली वर्तक    12/11/2019

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

सरत्या वर्षाने काय दिले

स्वप्न गंध स्पर्धा समूह आयोजित  झटपट काव्यलेखन स्पर्धा  विषय     सरत्या वर्षाने काय दिले  विचार करता मनी  काय मिळाले गत वर्षात  दिले सुख आनं...