कार्तिक शुध्द द्वादशीला
रंगविले छान वृंदावन
साधण्या तुळसी विवाह मुहुर्त
सजविले म्हणून अंगण
रंगविले छान वृंदावन
साधण्या तुळसी विवाह मुहुर्त
सजविले म्हणून अंगण
लावियल्या दीप माळा
काढून सुबक रांगोळी
उजळले प्रकाशानेअंगण
सुंदर दिसती दीप ओळी
काढून सुबक रांगोळी
उजळले प्रकाशानेअंगण
सुंदर दिसती दीप ओळी
ऊस बांधिले मंडपी अन्
माळा चिंचा -आवळे फुलांच्या
नैवद्य ठेवियला सामोरी
अक्षता वाटल्या लग्नाच्या
माळा चिंचा -आवळे फुलांच्या
नैवद्य ठेवियला सामोरी
अक्षता वाटल्या लग्नाच्या
चौरंगावर झाले विराजमान
बाळकृष्ण अमुचे ताम्हनात
स्वस्तिकाचा मधे अंतरपाट
अक्षता मंगलाष्टके जोरात
बाळकृष्ण अमुचे ताम्हनात
स्वस्तिकाचा मधे अंतरपाट
अक्षता मंगलाष्टके जोरात
तुळशीला नटविली छान
लाल हिरव्या वस्त्र न् आभुषणांनी
रीत सर बोलता ब्राह्यणांनी
दुमदुमला सोहळा मंत्रोच्चारांनी.
लाल हिरव्या वस्त्र न् आभुषणांनी
रीत सर बोलता ब्राह्यणांनी
दुमदुमला सोहळा मंत्रोच्चारांनी.
पडता अक्षता कृष्णा शिरी
अवघे आनंदिले जन
"शुभ मंगल "च्या गजरात
रमले आमुचे पण मन
अवघे आनंदिले जन
"शुभ मंगल "च्या गजरात
रमले आमुचे पण मन
संपन्न होता लग्न सोहळा
आनंद मनीं दाटला
वंदन करुनी कृष्ण तुळसीला
सर्व जनांना प्रसाद वाटला
आनंद मनीं दाटला
वंदन करुनी कृष्ण तुळसीला
सर्व जनांना प्रसाद वाटला
वैशाली वर्तक
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा