मंगळवार, १२ नोव्हेंबर, २०१९

गोष्ट एका लग्नाची (फक्त प्रसंग )

गोष्ट एका लग्नाची
     आमचा वाङनिश्चय लग्नाच्या आदल्या दिवशी संध्याकाळीच छान व्यवस्थित पार पडला . वाङनिश्चया नंतर व्याही भेटी चा कार्यक्रम झाला .दोन दिवस हाॕल घेतला होता. आदल्या दिवसा पासून लग्न गाजत होते. . ..पाहुणे मंडळी गावातली होती ती घरी झोपायला गेली ,पण ...बाहेर गावाहून आलेले नातेवाईक हाॕलवरच थांबले होते. त्यांचे मस्त गप्पा टप्पा ..हास्य विनोद चालले होते. आम्ही मात्र घरी झोपायला गेलो. घरी गेल्या गेल्याच बहिणी ने ," चला लवकरच झोपा ....उद्या सकाळी उठून जायचय. सर्वांच्या अंधोळी वेळेत झाल्या पाहिजेत . " असे उवाच्य केले. सकाळी लवकर उठून तयार होऊन देवास नमस्कार करुन निघालो. त्यावेळी माझी (आमची ) स्वतःची गाडी नव्हती. तेव्हा कुठे इतकी आर्थिक परिस्थिती .... गाडी स्वतःची असण्याची.... पण बहीणीला तिचे ओळखीचे स्नेही ...जोशी यांनी लग्नासाठी... गाडी ड्रायव्हर सह दिली होती. सकाळी निघालो.. आमच्या जवळ मुलीला देण्याचे दागिने तशीच आईच्या व ताईच्या दागिन्या ची जोखमी बॕग होती. ... ..अर्धे अंतर आलो असू , तर गाडी ....तिचे रुप दाखवू लागली .तशी गाडी नुकतीच गॕरेज मधून सर्वीस करुन आणलेली होती. पण मग त्या गाडीत काय प्रोबलेम होत आहे कळेना. ...काय माहित...मधेच आचके देत थांबायची. थोडा वेळ असेच चालले. जवळ सोने नाणे त्याचे टेंशन..आणि वेळेवर लग्नास पोहचण्याचे टेंशन सर्वांच्या मनात सुरु झाले. घरी जरी गाडी नव्हती तरी मी गाड्या हाताळल्या होत्या.. स्वतःला mechanical मधे रस होता व आहे . स्वतः mechanical engeer तसेच आटोमोबाईल चे पण ज्ञान होतेच. व शिक्षण पण घेतले होते. आई बहिण.... गाडी चालू होईना म्हणून चिंतेत पडल्या ..कसे लवकर पोहचणार .. ड्रायव्हर प्रयत्न करत होता. मधे कुठेच गॕरेज पण दिसत नव्हते. की ,...जिथे गाडी दाखवावी. शेवटी मीच ..बाह्या वर चढवून ... गाडीत काय प्रोबलेम तो पहावयास घेतला. ज्याचे 2/3 तासावर लग्न ....अन् तो 'मुलगा काय करतोय ?.....तर गाडी दुरुस्त करतोय ....क्षणभर वाटले उगाच रात्री घरी झोपण्यास आलो. त्यापेक्षा तिकडे हाॕलवर झोपलो असतो तर बरे झाले असते. मस्त हाॕलवर झोपलो असतो ..मित्रां बरोबर शेवटीची बॕचलर लाईफ ... हसी मजाक मधे घालविली असती ..पण आमच्या ताई बाई यांनी नको ...चला घरी चा हट्ट धरला ...असो. शेवटी गाडीचा प्रोबलेम कळला .इंजीन गरम होत होते ...गाडी मधे एखादी मोठी रिकामी बाटली पण नव्हती .... की कुठून पाणी भरुन आणावे. तेवढ्यात कुठेतरी construction चाललेले दिसले . ...तेथे ड्रायव्हर ला पाठवून पाणी मिळविले व कशी तरी गाडी सुरु झाली . व हाॕलवर पोहचलो .तेव्हा कुठे हाश झाले. लगेच fresh होऊन दुसरे कपडे चेंज करुन आलो. पण हाॕलवर पोहचलो तर सारे नातेवाईक माझे रुप पाहून विचारात पडले.. हात काळे ..घामाघुम .कपड्यास पण गाडीच्या बोनेटचे डाग... हा लग्न मुलगा ? प्रश्न पडला. मुलाची आई व बहीण पण घामाघुम ... त्यांच्या सर्व मेकअप ची वाट लागलेली व भरपूर टेंशन मधे दिसत होत्या. सासुरवाडीच्या लोकांनी माझ्या पायावर दुध पाणी टाकून ....औक्षण वगैरे आटपले. आई व ताई पण फ्रेश होण्यास पळाल्या.. कारण लग्न मुहुर्त साधला पाहिजेना ..आपल्यात मुहुर्ताला महत्व असते. उष्टी हळद मुलीच्या रुम वर पाठवली .ती मंडळी तेथेच रात्री राहिली होती. तिने पण पटपट आटपते घेतले. गुरुजी म्हणाले हरकत नाही आपण वैदिक पध्दतीने करु. प्रत्यक्ष लग्न विधीचा मुहुर्त आधी साधूया....मग नंतरचे विधी..... असे म्हणत एकदाच्या लग्न मुहुर्तावर मी बोह-यावर चढलो. आणि मुहुर्तावर माझ्या डोक्यावर अक्षता पडल्या.. व लग्न संपन्न झाले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

कष्टाचे चीज

कष्टाचे चीज      खरच त्यावेळी कापड गिरण्या जोरात चालायच्या.व नोक-या पण  मिळत होत्या.. जे कष्ट करण्यास तयार होते.त्यांना कष्ट करुन खरच शुन्या...