उपक्रम
चिंतन लेखावर चारोळ्या (5)
1 जिथे पूजनीय असे नारी
वसते देव देवता तिथे सदा
मिळे सतत सौख्य सुख तया
थारा नसे तिथे दुःखास कदा
2 विविध रुपात दिसते नारी
आई,ताई,वहिनी ,भार्या, मावशी
सदा वाहे ममता हृदयातूनी
सर्वच रुपातील ती वाटे हवी हवीशी
3 बहिणीची तर मायाच वेडी
आई च्या सम ताई वाटे
वहिनी पण प्रेमळ सदा
तिच्यासाठी मनीं आदर प्रेम दाटे
4 आजी तर करुणेचा सागर
तिचे प्रेम सर्वात आगळे
मायेची ऊब सदाच मिळे
आजीचे प्रेम तर जगा वेगळे
5 अशा विविध रुपातूनी
नारी असते देवी समान
तिच्या विणा अशक्य जीवन
कधी न करावा तिचा अवमान
....,,,,वैशाली वर्तक 23/9/2019
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा