स्पर्धे साठी
सुधाकरी विषय -- गणेश वंदना
सुधाकरी विषय -- गणेश वंदना
विनायक तूची ।
असशी ज्ञानाचा ।
सकल जनांचा ।
ज्ञानदाता ।।
असशी ज्ञानाचा ।
सकल जनांचा ।
ज्ञानदाता ।।
देवांचा ही देव ।
विश्वाचा पालक ।
कलेचा जनक ।
तुची देवा ।।
विश्वाचा पालक ।
कलेचा जनक ।
तुची देवा ।।
प्रथम पूजेचा ।
असे तुज मान ।
करिती सन्मान ।
सदाकाळ ।।
असे तुज मान ।
करिती सन्मान ।
सदाकाळ ।।
घेता तव नाम ।
दुःख निवारण ।
आनंदी जीवन ।
होत असे ।।
दुःख निवारण ।
आनंदी जीवन ।
होत असे ।।
गणराया तुची ।
आधार विश्वाचा ।
सा-याच जगाचा ।
तुची एक ।।
आधार विश्वाचा ।
सा-याच जगाचा ।
तुची एक ।।
रणांगणावर ।
तु ही धुरंधर ।
दुष्टांचा संहार ।
करण्यास ।।
तु ही धुरंधर ।
दुष्टांचा संहार ।
करण्यास ।।
तुला विध्नेश्वरा ।
आले मी शरण ।
करिते नमन ।
रात्रंदिन ।।
आले मी शरण ।
करिते नमन ।
रात्रंदिन ।।
करी कृपा आता ।
आम्हासी रक्षावे ।
दुःख हे हरावे ।
सकळांचे ।।
आम्हासी रक्षावे ।
दुःख हे हरावे ।
सकळांचे ।।
वैशाली वर्तक 9/9/2019
अभंग
*स्पर्धेसाठी*
शब्दसेतू साहित्य मंच पुणे
आयोजित राज्यस्तरीय अभंग लेखन स्पर्धा
दि .४/२/२२
विषय - रूप गणेशाचे
*दृष्टांचा संहारी*
रूप गणेशाचे । तीन अवतारी ।
दृष्टांचा संहारी । गणराया ।। 1
रूप गणेशाचे । दिसे मनोहर ।
प्रसन्न सुंदर । स्नेहदायी ।। 2
भाद्रपद मासी । पार्थीव रूपात ।
स्मरती मनात । गणेशाला ।। 3
नाश करण्यास । नामे नरांतक ।
तूची विनायक । प्रगटला ।। 4
गोजीरे ते रूप । बघते मी डोळा ।
भक्त झाले गोळा । जन्मदिनी ।। 5
चौसष्ट कलांचा । असे अधिपती ।
तूची गणपती । गणराया ।। 6
अथर्वशीर्षाचे । करते पठण ।
विध्नांचे हरण । होतअसे ।। 7
मनी एकाग्रता । लाभावी मजला ।
स्मरते तुजला । सांगे वैशू ।। 8
वैशाली वर्तक
अहमदाबाद
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा