बुधवार, २५ सप्टेंबर, २०१९

चिंतन लेखावर नारी लगत चारोळ्या

उपक्रम
चिंतन लेखावर चारोळ्या (5)

1   जिथे पूजनीय असे नारी
     वसते देव देवता तिथे सदा
     मिळे सतत सौख्य सुख तया
      थारा नसे तिथे दुःखास कदा

2     विविध रुपात दिसते नारी
        आई,ताई,वहिनी ,भार्या, मावशी
        सदा वाहे ममता हृदयातूनी
        सर्वच रुपातील ती वाटे हवी हवीशी

3       बहिणीची तर मायाच वेडी
          आई च्या सम ताई वाटे
           वहिनी  पण प्रेमळ सदा
          तिच्यासाठी मनीं आदर प्रेम दाटे

4       आजी तर करुणेचा  सागर
          तिचे प्रेम सर्वात आगळे
          मायेची ऊब सदाच मिळे
          आजीचे प्रेम तर जगा वेगळे

5       अशा विविध रुपातूनी
          नारी असते देवी समान
           तिच्या विणा अशक्य जीवन
          कधी न  करावा तिचा अवमान

  ....,,,,वैशाली वर्तक  23/9/2019




जाग रणचंडीके

 वेळआली नारीशक्ती जागृतीची
सज्ज  हो  तू प्रतिकाराला
नव्हती कधीच तू अबला
आठव तुझ्यातील  नारी शक्तीला

फोड वाचा  अन्यायाला 
अधमांना दे कर्माचे फळ
होऊनी रण चंडीका तूची
दाखव तयांना मनगटाचे बळ

आठव काळ, मर्दानी लक्ष्मीबाईंचा
शौर्य ,धैर्य  अन् पराक्रमाचा
घेऊनी  हाती , कर वार शस्त्राने
राक्षसी दानवी  त्या क्रूर कर्माचा

मात करण्या संकटावरी
स्व-रक्षणाचे घे तू धडे       
नराधमांचा अंत करण्या
तुझे बळ कधी कमी न पडे

जाण्या  सामोरे  नराधमांच्या
धैर्याचे  ठेव सदा हत्यार
नकोच ती , कधी म्यानात
आत्मविश्वासाची तळपती तलवार

आदी काळातील तुझीच रुपे
 आठव दुर्गा ,काली , अंबिके
करण्या  दृष्टांचा संहार 
जागी हो , तू रणचंडीके

वैशाली वर्तक



         
         


       





स्पर्धेसाठी 
मुक्त छंद साहित्य समूह महाराष्ट्र राज्य आयोजित दुर्गा महोत्सव निमित्ताने काव्यलेखन स्पर्धा 
दि २५\९\२४
विषय नवदुर्गा 
शीर्षक ...नव्या युगाची जननी

आदि काळापासूनची
काय वर्णावी महती
कधी नव्हती अबला
सर्व जग ची जाणती 

नाव चमकले जगी
जेथे टाकीते पाऊल  
 सर्व  क्षेत्रात  यशाची
  तुज लागते चाहुल

आहे  सशक्त महिला
अशा अनेक सबला
झाशी मर्दानी होतीच
नका संबोधु अबला

 दुर्गा देवीच्या रुपात
 मन होते सदा दंग
 *नव्या युगाची जननी*
 आगळाच तुझा रंग


सर्व  क्षेत्रात दिपावी
तुझ्या  उन्नतीची किर्ती
 मिळो तव प्रयत्नांना 
पूर्णपणे  स्वप्नपूर्ती


नवी स्वप्ने नवी दिशा 
कर विश्व पादाक्रांत
जगज्जेता तू होशील
हरण्याची नको भ्रांत

आहे तुझी नवरूपे
पुजताती सदा काळ
 दुर्गा तू ब्रह्मचारिणी  
करी सुखाची सकाळ 


वैशाली वर्तक
अहमदाबाद
८१४१४२७४३०



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

वही.

मोहरली लेखणी साहित्य समूह  उपक्रम 1391 दि 3/2/26 विषय. वही आनंदिले मनोमनी वही पाहून  सुंदर  गुज मनीचे सांगण्या  मन धावे क्षणभर  किती सुबक बा...