बुधवार, २५ सप्टेंबर, २०१९

ऋण आई वडीलांचे


 विषय -- ऋण  आई वडिलांचे

आई असते प्रत्येकाची आद्य  गुरु
वडील  असतात पालन कर्ता
दोघांचेही   जीवनभर  असे ऋण
पाल्यांसाठी सदा  ते दुःख हर्ता

तयांच्याच कृपा दृष्टीने
घडते पाल्यांचे भावी उज्वल
ठेवावी ह्याची सदा जाण मुलांनी
स्मरण ठेवावे त्यांचे  हेच मत प्रांजल

उपकारांची न वाचता बाराखडी
बनावे तयांची आधार काठी
ख-या अर्थाने परत फेड करावी
सदा सेवा करुनी रहावे त्यांच्या  पाठी

हौस मौज मुलांची पुरविण्यात
स्वतःच्या  सुखदुःखाचे करुनी दुर्लक्ष
मुले कशी सतत रहातील  सुखी
यात मात्र  सदाची असती दक्ष

 जीवनात नित्य स्मरावे
देवुनिया तयांचा सदा मान
व्हावे श्रावण बाळ समान
राखावा  आई वडिलांचा सन्मान

वैशाली वर्तक  १९/९/२०१९

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

कष्टाचे चीज

कष्टाचे चीज      खरच त्यावेळी कापड गिरण्या जोरात चालायच्या.व नोक-या पण  मिळत होत्या.. जे कष्ट करण्यास तयार होते.त्यांना कष्ट करुन खरच शुन्या...