विषय - मनात खरच आहे का तिरंगा
*जन जागृतीची गरज*
घरा घरात फडकला तिरंगा
खरच स्थान आहे का मनात
राहून राहून येतो विचार
काय उत्तर द्यावे क्षणात
प्रश्न पडणेआहे स्वाभाविक
आपणच आहोत जवाबदार,,
आयत्या मिळालेल्या स्वातंत्र्याची
किंमत कशी कळणार
फिरवा नजर इतिहासात
नव्या पीढीला करा जागृत
समजवा यातना पारतंत्र्याच्या
समजता होतील स्वीकृत
वाचा पाढे हुतात्म्यांचे
तिरंग्यासाठी दिधले प्राण
जाणा अभिमान तयांचा
व्यर्थ न जावो त्यांचे बलिदान
जाणता महती तिरंग्याची
नको नुसते वैचारिक महत्व
मनातून करा त्याचे पठण
कृतीत दिसेल त्याचे प्रभुत्व
देशप्रेम देशभक्तीची
द्यावी सदैव शिकवण
विश्वात शोभावा भारत
याची ठेवा आठवण
वैशाली वर्तक
अहमदाबाद
विषय .. चिरायू प्रजासत्ताक दिन
ठेवू मान स्वातंत्र्य दिनाचा
नाही प्राप्त झाले ते सहज
स्वातंत्र्य वीरांनी अर्पियले
प्राण त्यांनाच स्मरणे गरज.
नव्हते स्वातंत्र्य आपणास
केल्या चळवळी अविरत
किती सोसावा त्यांचा अन्याय
आधी करावा स्वतंत्र भारत
केले देशासाठी दुर्लक्षित
स्वतःची कुटुंब व संसार.
देश केला पारतंत्र मुक्त
स्वातंत्र्य प्राप्ती हाच विचार
प्रजासत्ताक दिन साजरा
करिती स्वतंत्र भारताचा
प्रजेच्या सत्तेने चाले देश
आनंदी दिन सा-या देशाचा
बलसागर होवो भारत
असती आपुल्या अभिलाषा
चिरायू प्रजासत्ताक दिन
जगी उन्नत भारत आशा
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा