सिध्द साहित्यिक समूह
विषया - चैतन्याच्या बहराने
शृंगारली वसुंधरा
बरसता वर्षाधारा
सजलेली दिसे सदा
सांगे कानी थंड वारा
चैतन्याच्या बहराने
हिरवळ चहुकडे
मन डोले आनंदाने
वाटे पाहू कुणीकडे
निसर्गाची शिकवण
नसे सदा मरगळ
जाता दुःख येते पहा
सुख रुपी हिरवळ
झाली भर सौंदयात
दिसे इंद्रधनु मागे
दावी अवनी नभीचे
जणु प्रीतीचे ते धागे
पुष्पे पहा बहरली
कळ्या डोकवी पानात
फूले फूलूनी ऊधळे
गंध ही आसमंतात
येवो असाच बहर
तुझ्या साहित्यात सदा
मिळो यश किर्ती तुला
वाढो लौकिक सर्वदा
वैशाली वर्तक
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा