अधीर झाले मी ! तव दर्शनास
मनी एक ध्यास ! सदासाठी 1
मुखी नाम घेते ! करिते रटण
दाखव चरण! तूची आता 2
कसे आले दिन ! गाठ भेट नाही
मन वाट पाही ! भेटण्याची 3
आप्त जना साठी ! जीव हा तुटतो
धीर हा सुटतो !सदाकाळ 4
काय वेळ आली! कशी महामारी !
कोण आम्हा तारी !तुजवीण 5
कसा राखू धीर ! मन हे अधीर
जरी मी सुधीर ! ठेवूकैसे 6
करीती प्रयास ! जरी सारे जन
निराशले मन! सकळांचे ! 7
मन हे अधीर !ये ना उध्दाराया !
तूच रामराया ! जगताला !! 8
वैशाली वर्तक
विषय.
वसंत प्रेमाचा
प्रकार. अभंग
शीर्षक... प्रेम ऋतू
नाम सदा ओठी | स्वप्नात रंगते |
निरस भासते. | तव वीण. ||. १
सुवास प्रीतीचा | वसंत प्रेमाचा |
हृदयी स्नेहाचा | प्रेम ऋतू. || २
गंध सुमनांचा | वसतो फुलात. |
तूची अंतरात. | क्षणोक्षणी. ||. ३
मोहक रूपाने |. लावलीस आस |
भेटण्याचा ध्यास |. लागे जीवा |. ४
मधाळ हास्याने | वेडची जीवाला. |
अधीर मनाला | करितसे. ||. ५
प्रीत ती अबोल | भेटण्या बहाणे. |
प्रेमाचे तराणे | नित्यनवे. ||. ६
वाट पाहे नभी | शुक्राची चांदणी |
तूची सदा मनी | माझा शशी. ||७
वैशाली वर्तक
अहमदाबाद
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा