स्वराज्य डिजिटल कलामंच
अष्टाक्षरी कविता लेखन स्पर्धा
विषय - कुणी नाही कुणासाठी
*कोणी कुणाचे नाही*
आलो एकटेच जगी
वाढविले स्वखुषीत
दिले प्रेम पालकांनी
मोठे केले सोबतीत
भोगण्यास नाही कुणी
स्वकर्माचे कर्म फळ
मंत्र ठेवा सदा ध्यानी
हवे मनी आत्म बळ
वाचा पाढे स्वकर्माचे
नको कुकर्म जीवनी
भागीदार होत नाही
दुःख भोगण्या त्याक्षणी
कर्म सिध्दांत वदले
कृष्ण अर्जुनास रणी
कुणी नाही कुणासाठी
कर कर्म रणांगणी
आयुष्याच्या सांजवेळी
कुणी नाही कोणासाठी
आता तरी जगून घे
काही क्षण स्वतःसाठी
वैशाली वर्तक
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा