डाॕ दिलीप म्हेत्रे स्पर्धा
वाढ दिना निमित्त राज्यस्तरीय
अष्टाक्षरी काव्य लेखन स्पर्धा
*शुभेच्छांचा वर्षाव*
दिन असे आनंदाचा
करु साजरा मिळूनी
देउ तयांना शुभेच्छा
अष्टाक्षरी काव्यातूनी
लाभो सृदृढ आरोग्य
घडो नित्य रूग्ण सेवा
देवासम तुम्हा मान
ज्ञानरूपी तव ठेवा
लाभो सौख्याचा बहर
मिळो सदा यश किर्ती
सा-या जगी उजळावी
नामांकित तव मूर्ती
देवी शारदेचे तुम्हा
मिळालेले वरदान
प्रज्ञावंत साहित्यिक
सर्व क्षेत्रात महान
सारे देती शुभाशीष
होण्या तुम्ही औक्षवंत
आईबाबांचे आशिष
तुम्ही खरे भाग्यवंत
काव्यातूनी पाठविल्या
शुभ आशिष शुभेच्छा
पूर्ण होवोत कामना
ह्याच आमुच्या सदिच्छा
वैशाली वर्तक
अहमदाबाद
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा