अष्टपैलू संस्कृती कला अकादमी , मुंबई (रजि)
आयोजित
अष्टपैलू काव्यमंच साहित्य समूह
उपक्रम क्रमांक 63
साप्ताहिक उपक्रम
माघ शुध्द चतुर्थी *श्री गणेश जयंती*निमित्त
विषय - गौरीनंदन
*गणेश वंदना*
तव नामाचा महिमा
शब्द नसे गुण गाया
तुची असे सुखकर्ता
गजानना गणराया 1
शुभंकर गौरी नंदना
बाप्पा वाटे आपला
तूचीअसे दुःख हर्ता
किती नांवे रे तुजला 2
असे माघी जन्मोत्सव
माघी गणेश जयंती
केला दृष्टांचा संहार
तीलकुंद चतुर्थी वदती 3
असे प्रथम पुजेचा
तुजलाची सदा मान
देतो आनंदी जीवन
करी तुझाची सन्मान 4
वेद सिद्ध , एकदंत
रणांगणी धुरंधर
करी दुष्टांचा संहार
ठेव कृपा निरंतर 5
चौदा विद्या अवगत
तव महिमा अपार
अधिपती स्वामी तूच
कुणी म्हणती मंदार 6
सौ वैशाली अविनाश वर्तक
अहमदाबाद
गुजरात
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा