मंगळवार, ८ मार्च, २०२२

जन्म तो बाईचा

नमस्कार 
माझी  लेखणी साहित्य  मंच, शहापूर जि ठाणे
आयोजित 
जागतिक महिला दिन निमित्ताने भव्य दिव्य  यूटूयुब चॕनलवर 
व्हिडीओ द्वारे स्वरचित कविता सादरी करण स्पर्धा
 विषय - जन्म बाईचा


असती  दोघे समान
घड्याळ आणि बाई
अविरत गुंग कामात
नसे उसंत,...सदैव घाई

 दिसे  होता सकाळ
 तिजला स्वयंपाक घर
चहा दुध नास्ता जेवण
यादी कामाची तयार

करती प्रेमाने संगोपन  
आपल्या पाल्याला रिझवित
लक्ष असे  घड्याळ्यात
सारी कामे संभाळीत

घड्याळ काट्यांच्या तालावर
कामे करिते प्रत्येक नारी
वेळ पाहून कामाचा राडा
नारी खुशीत उचलते भारी


 धन्य तो जन्म बाईचा
सर्व क्षेत्रात  घेते भरारी
घर -दार मुले- कुटुंब
संभाळण्याची मनी उभारी

वैशाली वर्तक 
अहमदाबाद

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

सरत्या वर्षाने काय दिले

स्वप्न गंध स्पर्धा समूह आयोजित  झटपट काव्यलेखन स्पर्धा  विषय     सरत्या वर्षाने काय दिले  विचार करता मनी  काय मिळाले गत वर्षात  दिले सुख आनं...