सावली प्रकाशन समूह
उपक्रमासाठी
षडाक्षरी काव्य रचना
विषय - बलिदान
*वीर जवान*
भारत मातेचे
ते वीर महान
स्वातंत्र्य लढ्याचे
शहीद जवान
न करता पर्वा
अर्पियले प्राण
ध्येय प्राप्ती साठी
केले *बलिदान*
इतिहास सांगे
तयांची महती
स्वातंत्र्य वीरांची
किर्ती ती जगती
जाहले अनेक
वीर अगणिक
अमर कहाणी
ती ऐतिहासिक
नकोची नुसते
करणे स्मरण
जाणु बलिदान
करीता वंदन
उपकार फेड
नसेची सहज
स्वातंत्र्याचा मान
आजची गरज
वैशाली वर्तक
कल्याण डोंबिवली महानगर 2
आयोजित उपक्रम
विषय - चैतन्याचे वारे
सहाक्षरी रचना
*येता वर्षाधारा*
सजली वसुधा
होता वर्षाधारा
सुंदर फुलली
सांगे कानी वारा
बहरली सृष्टी
पाचू चहुकडे
चैतन्याचे वारे
पाहू कुणीकडे
नसे मरगळ
आले सणवार
आप्त भेटण्याने
मोद दिसे फार
लेक येता घरी
प्रेम भाव खरा
दिसे मुखावरी
चैतन्याचा झरा
श्रावण मासात
दिसे हमखास
चैतन्य वाहते
सर्वत्र उल्हास
आगमन श्रींचे
चैतन्याचे वारे
येता गणराया
उत्सव ते न्यारे
वैशाली वर्तक
अहमदाबाद
साहित्य सेवा स्पर्धा समूह
आयोजित
उपक्रम
षडाक्षरी लेखन
विषय - सुंदर शर्वरी
मोहक शर्वरी
सजली सुंदर
पहात रहावे
रूप मनोहर
टिपूर तारका
आल्या ठुमकत
एका हून एक
होत्या चमकत
शशी चांदण्यांचा
रंगलेला खेळ
शर्वरीने तिचा
जमविला मेळ
रात्रभर वाहे
शीतल पवन
भरले सारेच
ता-यांनी गगन
खेळ पाहताना
डुले रातराणी
गंध उधळीत
गात होती गाणी
अलवार आली
रवीची चाहुल
आवरला खेळ
काढते पाऊल
वैशाली वर्तक
अहमदाबाद
विश्व शारदा सा मी( मुख्य)
*राधेचा श्रीहरी*
ध्यानी मनी तिच्या l
देवकी नंदन l
मुखी हरीनाम
करिता मंथन l
अविरत करी l
हरिचे चिंतन l
बोली कृष्ण कृष्ण
तियेचे कंकण l
नको जाऊ कृष्णा l
कैसे कंठु दिन l
जीव तुजवीण ll
माझा होतो क्षीण l
मुरलीचे वेड l
लावीतो श्रीहरी
आहे राधाभोळी
भाळीली बावरी l
राधा रमणचे l
प्रेमच आगळे l
आहे सर्वाहून l
जगी या वेगळे l
श्रीहरी राधेचा l
आत्मा एकरुप l
पहा अव्दैताचा l
प्रगटला दीप l
वैशाली वर्तक
अहमदाबाद
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा