शब्दसेतू साहित्य मंच आयोजित साप्ताहिक उपक्रम स्पर्धा क्र 2/22
अव्यक्त अबोली साहित्य मंच आयोजित स्पर्धा
स्पर्धासाठी
विषय - माझे वडील माझा आदर्श
*निष्ठावंत बाबा*
माझा बाबा निष्ठावंत
तेची घराचा आधार
किती आनंदे संभाळी
सा-या कुटुंबाचा भार
लेकरांच्या सुखासाठी
सदा तळमळ साही
स्वतः कडे दुर्लक्षता
कुटुंबाचे सुख पाही
चिंता आम्हा लेकरांची
मनी एकची तो ध्यास
होवो मुले यशवंत
हीच असे मनी आस
सारुनिया हौसमौज
सदा घडविण्या दक्ष
पुरविले हटृ लाड
आम्हा मुलांकडे लक्ष
जरी संगे नाही बाबा
केले आम्हा भाग्यवान
गेल्या जन्माची पुण्याई
झालो आम्ही पुण्यवान
तेची मजला सर्वस्व
बाबा आहेत आदर्श
पोहण्यात पारंगत
माझा केलाय उत्कर्ष
किती ऋण मजवरी
कधी न व्हावा विसर
फेडण्यास त्याचे ऋण
घडो सेवा निरंतर
वैशाली वर्तक
अहमदाबाद
विषय- बाबा
2 बाबा माझे द्वैवत
अहो वहीनी ," नाना आहेत का ?
आई " हो आहेत , आताच आले आहेत"
आमच्या घरी दिवे गेले आहेत हो. जरा येतील का आमच्याकडे? मला काहीच कळत नाहीत्यात
(आतून बाबांचा आवाज येतो. )
आलोच मी ह. आलोच... व्हा तुम्ही पुढे .
(आलेले शेजारी घरी जातात. मनात समाधान की हाश ...नाना आलेले होते .बर आहे काम आपले होईल )
आई..,"अहो , जरा बाहेरून आलात चहा तरी घेऊन जा. "
पण ते ऐकले तर बाबा कसले .ज्यांच्या मनात सेवा भावी वृत्ती ठासून भरलेली
"अग हा गेलो आणि आलो च. तुझ्या बरोबर चहा घेण्यास ."
आग सध्यांकाळ होईल अंधारात बसावे लागेल. लहान मुले घरात मी जाऊन येतोच.
असे होते .... आमचे बाबा ..कोणाला ही मदत करण्यास सदैव तयार . सामान्य परिस्थितीत रहाणारे. पेशवे कालीन मंदीर, त्याच्या आवारात छोटी छोटी.घरे होती. सर्व रहेवासींची साधी सरळ रहाणी.
समाजाचा गणपती उत्सव वा दत्त जयंती नंतरची पालखी ..बाबा पालखी घेउन चालण्यास हजर.. कधीही हसत मुख... दुर्मुखलेला चेहरा नाही .पैशानी फार श्रीमंत वा स्वतःचे घरदार असे काहीच नव्हते. पण समाधानी कोणाला म्हणतात तर त्यांच्याकडे पहावे.
अमरावती सोडून आत्याने भाच्याला इकडे ये..कापड गिरणीत नोकरी मिळेल.म्हणून अहमदाबाद ला बोलवून घेतले. आधी आत्याकडे राहिले एकटे असता...
मग लहान भाड्याच्या घरात राहू लागले. स्वतः , लहान बहीण , आई व पत्नी सह संसार सुरु केला. परिस्थिती ठीक ठीक. बहिणीचे पण त्या काळात फाईनल पर्यत शिक्षण केले. ते पण आईच्या (बायकोच्या) सागण्यानेच .
महेनती वृत्ती .तसेच स्वाभिमानी स्वभाव.. पडेल ते काम करण्याची तयारी असायची. त्यांच्या या स्वभावाने त्यांनी घराचा संसाराचा छान उत्कर्ष साधला. आईस पण माहेरची कधी आठवण येऊ दिली नाही .तिची शिक्षणाची हौस पूरी केली त्याचा बरोबर तिचा हातभार पण संसारास लागला.
रोज सकाळी तिच्या बरोबर उठून कोळशाची शेगडी पेटवून देणे ,.भाजी चिरणे . आणि ....मुखाने श्रीरामाचा जप. अशी त्यांची सकाळ व्हायची.
पोळी भाजी कोशिंबीर चा डबा घेऊन सकाळी 7 ला कापड गिरणीसाठी रवाना व्हायचे. आईची पणशाळाअसायची .त्यामुळे तिला मदत करत अशी एकमेकांना साथ असायची.
स्वभावात खेळाची आवड , मनाने संघिष्ट विचार सरणी,
होईल तितकी सर्वांना मदतरूप होण्याची वृत्ती .
कुठलाही समाजाचा कार्यक्रम असता बाबांची सर्व जण सातत्याने आठवण करत. कोणास अडी अडजणीस धावून जाणे अंगी मुरलेले. कुठलाही सांस्कृतिक कार्यक्रम असो वा मैदानी खेळ असोत बाबांचा सहभाग व संचलन असणारच.
अहो ! खेळाची आवड तर होतीच . स्वतः अमरावतीस हनुमान व्यायाम शाळेचे उत्तम मलखांब करणारे .तसेच उत्तम खो -खो , कबड्डीचे खेळाडू. ह्याच खेळाडू वृत्ती ने मला पोहण्यासारख्या खेळात ... त्या काळात पण .पोहण्याच्या स्पर्धेत भाग घेण्यास व देशभर जाण्यास मुभा दिली.
खरच आज मी जी काय फुशारकी करतेय त्याचे सर्व श्रेय त्या निष्ठावंत बाबांचे आहे. जेव्हा माझे शाळा काॕलेज तसेच राष्ट्रीय स्पर्धेत पेपरात फोटो यायचे, तेव्हा त्यांच्या मुखावरील आनंद अजून मी विसरले नाही.
आता अलीकडे मी पुन्हा तरण स्पर्धेत भाग घेतेय, तेव्हा त्यांनाच वंदन करून स्मरण करते. व त्याची उणीव मनास जाणवते. आता ते असते तर काय खुष झाले असते.
बाबा जेव्हा गेले तेव्हा रहात्या विभागाचा सारा जन समुदाय हळहळला.
बाबा म्हणजे सेवा मूर्ती .. आता असे धावत येऊन मदत करणारे..सर्वांच्यात खेळाची आवड निर्माण करणारे . सेवाभावी लोक मिळणे कठीण.
सेवा भावी वृत्ती चे उदाहरण .शेजारच्या काकू वारल्या .त्यांना काहीतरी चामडीचा विचित्र रोग झाला होता. मृत देहास हात लावण्यास कोणी धजत नव्हते. त्या वेळी प्रामुख्याने सर्वांना बाबांची आठवण झाली आता जर ते असते तर न कुरबूर वा
न मागे पुढे पहाता अंत्य विधीला पुढे आले असते. असे अनेक प्रसंग होते जीवनात.असे सेवाभावी वृत्ती चे..मदतीला धावून येणारे ..जसे कुटुंबाचा आधार व तसेच समाजात पण प्रिय . माझे तर ते दैवत होते माझे बाबा..
वैशाली वर्तक
अहमदाबाद
3
शब्दसेतू साहित्य समूह
साप्ताहिक उपक्रम
विषय - बाबा
*पत्र लेखन बाबांना*
पत्र पत्र लेखन
श्री
प्रति
सचिन वर्तक
अलका बंग्लोज
भागल
सुरत
तीर्थरुप बाबांना
सा न वि वि
आता सर्वत्र कोरोनाचे वादळ शमून पूर्ववत जग जीवन सुरु होत आहे.ही खरोखरच आनंददायी बाब आहे. माझी ११ वी व १२ वी घरीच बसून झाली .
सतत मी वरच्या खोलीत असायचो. . त्यात ट्युशन पण
online .कधी संपतोय कोरोनो असे झाले होते. फक्त परीक्षा देण्यास मला
प्रत्यक्षात जावे लागले.
शेवटी offline परीक्षा झाल्या. मार्क पण छान आले . आनंदाची बाब म्हणजे तुमच्या च काॕलेज मधे मला प्रवेश मिळाला. छान शिस्तीचे काॕलेज आहे.
तुमच्या वेळी एवढी खाजगी काॕलेजस नव्हती. त्यामुळे सरकारी LD eng मधे नाही तर मग अहमदाबाद बाहेर जावे लागे. त्यात हे निरमा नवे .म्हणजे तुमचीच पहिली बॕच होती.
. तेव्हा ते गावात जुन्या एका शाळेत सुरू केले होते. रोज आधी शाळे प्रमाणे प्रार्थना व्हायची. मग काॕलेज आता चे नवीन तेने सुरु झाले वास्तू तीच पण जास्त अद्यावत.
काय योगायोग मी त्याच काॕलेजात शिकत आहे.
पण मी नशिब वान तुमच्या पुण्याईने ..मी रोज स्वतः ची गाडी घेऊन येत आहे,
तुम्ही मित्रा बरोबर स्कुटरने .... ते पण ... एकआठवडा एकाने तर दुसरा आठवडा मित्राची स्कूटर ..असे पेट्रोल बचत करत येत होता.
पण ,मला पण ती जाणिव आहे .तुमची यंदा बदली झाल्याने आम्हाला
तुमच्या बरोबर गप्पा करता येत नाही म्हणून पत्र द्वारा कळवित आहे.
तुमच्या वेळचे काॕलेजचे रूप व आताचे फार बदलले आहे
पण मला त्या वास्तूत तुम्ही 3 वर्ष होता त्याचा आभिमान व आपुलकी वाटते
तुमच्या बरोबर शिकलेले दोन विद्यार्थी आम्हास शिकवायला आहेत .अडनावावरून
चौकशी करता ओळख निघाली. त्यांनी तुमची हुशार विद्यार्थी म्हणून खूप स्तुती केली.. मला फार आनंद झाला व अभिमान वाटला.
तुमची काही पूस्तक मी वापरत आहे . किती छान वाटते तेव्हा .कसे सांगू तुम्हाला ?
तुम्ही जणु पुस्तकातून जवळ असल्याचा भास होतो.
तुम्ही शनिवार रविवार या.. मला काॕलेजच्या तुमच्याशी खूप गप्पा व काही न समजलेल्या अभ्यासाच्या अडचणी विचारायच्या आहेत.
प्रत्यक्षात भेटी नंतर सविस्तर बोलू .तुमची बदली झाल्याने मला वेळोवेळी तुमची
उणीव जाणवते
शनिवारची वाट पहातो.
तुमचा लाडका
आदित्य
शत शब्द कथा बाबा
5
शब्द सेतू साहित्य मंच
साप्ताहिक उपक्रम स्पर्धा
क्रमांक 2/22
विषय - बाबा
चारोळ्याचारोळ्या
बाबा व्यक्ती असे अशी
ऋण त्यांचे असे जन्मभर
देतो योग्य जीवनाला घडण जडण
आपले यश त्याच्या जीवावर 1
सारुनिया स्व हौस - मौज
मुलांना घडविण्यात दक्ष
हट्ट पुरवीती, राहूनी शिस्तबद्ध
सदैव कुटुंब प्रगतीत लक्ष 2
बाबा असतो निष्ठावंत
तोची कुटुंबाचा मुख्य आधार
नसे कधी मनी कंटाळा
संभाळण्याचा घर- दाराचा भार 3
चिंता बाबांना असे कुटुंबाची
मनी राही एकची ध्यास
उठता - बसता एक विचार
व्हावी मुले यशवंत ही आस 4
एकच करते विनवणी देवा
ऋणांचा त्यांच्या व्हावा न विसर
येवो किती प्रसंग अकट विकट
घडो मज करवी सेवा निरंतर 5
वैशाली वर्तक
अहमदाबाद
प्रेषक
आदित्य वर्तक
शरणम 7
6
शब्दसेतू साहित्य मंच पुणे.
साप्ताहिक उपक्रम स्पर्धा क्रमांक 2 / 22
शतशब्द कथा.शतशब्द कथा
आदर्श व्यक्तीमत्व
सहज त्या दिवशी गप्पा करत तरुण मंडळी बसली होती. गप्पात संस्कार च्या गोष्टी निघाल्या. आणि *नाना गोडबोले* .खरच काय व्यक्ती होत्या ना. समाजात त्यांचा आदर युक्त दरारा. काही कार्यक्रम असो. ते नुसते सभागृहात आले की सर्व टवाळ मुले पण शांत व्हायची.
एवढेच नव्हे आज आम्ही पध्दत शीर सूर्य नमस्कार घालतोय व आपल्या मुलांना शिकवतोय त्याचे श्रेय नानांना जात.
सकाळी नियमित न चुकता. मंदीराची घंटा वाजवायची की आम्ही देवळात हजर असायचो. शिस्तबद्ध सूर्य नमस्कार अगदी,
आदिस्तस्य नमस्कारम्..
हा ..श्लोक शिकवून सूर्य नमस्कार घालून घेत .
.संध्याकाळी पण मंदीरात परवाचा . मग अगदी बे पासून पाढे म्हणून घेत ,ते 21 पर्यंत.
तसेच अगदी सारे श्लोक व सायंकाळची स्तवने म्हणून घेत. मग त्यात हरीपाठ पण व्हायचा.
दर रविवारी रात्री आठ वाजता घंटा वाजवित. त्यात प्रार्थना , गीतेचे श्लोक व शेवटी रामदासांची "कल्याणकरी देवराया" प्रार्थना .. काय सुंदर वळण लाविले होते. आता काही नाही.
अशा गप्पा चालू होत्या आणि मी तेथे गेले . सारे म्हणाले आता तुझ्या वडिलांच्या ... बाबांच्याच गप्पा करत होतो.
मी म्हटले हो ....थोडे फार आले माझ्या कानावर ..माझे मन ते सारे एकून भरून आले. खरच होतेच ते शिस्तबद्ध पण प्रेमळ.
त्यांचे व्यक्तीमत्व अजून सारे आठवण करतात. मला पण आभिमान वाटतो बाबांच्या व्यक्तीमत्वाचा.
तर माझी नात होती बरोबर ती म्हणाली ,"अच्छा नाना म्हणजे माझे आजोबा तुझे बाबा तर.
वैशाली वर्तक
अहमदाबाद
भारतीय साहित्य व सांस्कृतिक मंच धुळे
आयोजित उपक्रम 377
विषय... बापाची व्यथा
शीर्षक..निष्ठावंत बाप
असे जीवन कष्टाळू
तोची घराचा आधार
त्याच्या जीवावर चाले
कुटुंबाचे व्यवहार
पत्नी बाल्यांच्या गरजा
पुरविण्या सदा दक्ष
कष्ट साही तयांसाठी
स्वतः कडे ते दुर्लक्ष.
कधी जाणून न देता
कुटुंबाला ठेवी सुखी
माझे कुटुंबीय जन
मात्र न व्हावेत दुःखी
बाल्य असे जीव प्राण
यशवंत होवो मनी आस
पण दु:ख येता ओठी
आई शब्द हमखास
आईअसे मानाचं स्थान
बाप करी कष्ट अपार
उभा राहतो निश्चल
येता बिकट प्रसंग फार
वैशाली वर्तक
अहमदाबाद
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा