रविवार, ५ जुलै, २०२०

पत्र लेखन मोहरली लेखणी

स्पर्धेसाठी  पत्र लेखन

सौ वैशाली अ. वर्तक
सेटेलाईट
अहमदाबाद 380015
६/६/२०२०


प्रिय मोहरली लेखणीस,
      खास आज पत्र  लिहीण्याचे कारण पण तसच आहे. बाकी तर रोजच तुला भेटतो. तू विषय देतेस . आम्हाला बोलते करतेस .पण आज,  प्रथम तुला वर्धापन दिनाच्या खूप ..खूप  शुभेच्छा. अग ,पहाता पहाता वर्षाची झालीस ..कळले पण नाही. वाटते आता आता कडे अश्विनी ताईंचा फोन होता. तुझे नामकरण करुन .तुझे कौतुकाने स्वागत केले . भरभरून  सारस्वतांना तू लिखाणास प्रेरित केलेस.
       खर सांगू  सर्व  नवोदित साहित्यिकांना तू  नवे व्यासपीठ प्राप्त करुन दिले. त्यांच्या लिखाणास धार आणली. रोजचे नवे विषय... कधी चारोळी तर कधी चित्र काव्य तर कधी काव्य रसग्रहण.एवढेच नव्हे तर  काव्याचे  विविध प्रकार शिकविले . त्यांचे सराव  पण करुन घेतले. जसे शाळेत शिकवतात ना अथवा  आई मुलांना शिकवते ना !  .तसे उपक्रम राबवून तू अविरत लिखाणात रस घेण्यास प्रवृत्त  केले.
 आणि हो!  आपल्या माय मराठी ची सेवा आमच्या कडून घडविलीस .माय मराठीला  जागते ठेवण्याचे    व मराठी भाषेची सेवा करण्याचे छान कार्य  केलेस ..नुसते "मराठी बोला  मराठी वाचवा" अशी संभाषणे न देता खरच मोलाचे काम केलेस .व वेळोवेळी स्पर्धा घेऊन साहित्यिकांना प्रमाण पत्र  देऊन खूष पण केलेस .
      अर्थात यात अश्वीनीताई ,दिपाताई व वेळोवेळी परिक्षकांनी तसेच  ...  त्यात आणिक म्हणजे   प्रमाणपत्र  देऊन काशीराम सर यांनी पण खूप  मोलाचे काम केले.
      तर हा सर्व  व्याप  नाही काही कमी नव्हे.  200 च्या वर साहित्यिकांची टोळी घेऊन तू  मोहरली आहेस . असेच अनेक वर्धापन दिन येवोत हीच  शुभेच्छा .उद्या  पुन्हा  भेटूच .तुला भेटल्या शिवाय चैन पडते का आम्हाला तरी...चल तर ...... आवडती सखी ..मोहरली लेखणी पुन्हा  एकदा शुभेच्छा




वैशाली वर्तक

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

कष्टाचे चीज

कष्टाचे चीज      खरच त्यावेळी कापड गिरण्या जोरात चालायच्या.व नोक-या पण  मिळत होत्या.. जे कष्ट करण्यास तयार होते.त्यांना कष्ट करुन खरच शुन्या...