उपक्रम २/७/२०२०
विषय - अंदाज
उन्हाळे पावसाळे जितके
पाहून होतात जास्त
अंदाज येतो अनुभवाने
तितकाच अगदी रास्त
कुठल्या ही परिस्थिती
अंदाज असे अनुमान
नसे पूर्ण पणे तंतोतंत
बसणारा असे तो किमान
घरातील मोठ्यांचा अंदाज
अनुभवाने असे येणारा ठराव
हळुहळु जमते सर्वांना
जसा होतो काळाने सराव
सगळे अंदाज अनुभवावर
पण जन्म मृत्यू चा अंदाज
काळच त्याला ठरवितो
तेथे ठरे **वरचाच*** फलंदाज
वैशाली वर्तक
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा