सोमवार, ३० मार्च, २०२०

गुढी माणुसकीची/गुढी मांगल्याची.. मना मनातील गुढी प्रेमाची\मराठी नववर्ष \

रचियता साहित्य समुह
मराठी नववर्षा निमित्त
राज्य स्तरीय  काव्य स्पर्धा

विषय -माणुसकीची गुढी उभारु

     माणुसकी दावू एकमेकांना
     विसरुनीया सर्व जाती धर्म
     माणुसकीची गुढी उभारु      माणुसकीची घेउ ध्वजा
      समजून घेउ   जीवनाचे मर्म   

       देवाची सारी बालके मानव
       सर्वची तयास असती समान
       कसा करेल तो दुजाभाव
        मानु नये कोणासही लहान

        सारे बांधवआपण एकमेकांचे
        विश्व बंधुत्वाची भावना जागवुया
          मंत्र  समतेचा सर्वत्र देऊनी
        माणुसकीची ध्वजा फडकवुया

        वैशाली वर्तक
        अहमदाबाद  (गुजराथ )



मोहरली काव्यबत्तीशी साहित्य  समूह आयोजित  
गुढी पाडव्या निमित्त काव्य बत्तीशी काव्य रचना स्पर्धा 
*स्पर्धेसाठी*
विषय -- गुढी उ भारु  मांगल्याची
शीर्षक-  *सण पाडव्याचा*
 सण आला तो पाडव्याचा
उभारायाची  गुढी
उभारु गुढी मांगल्याची
 संस्कृतीची ती रुढी                          1

होतो नव वर्ष आरंभ
गुढी तोरणे बांधू
दावितसे शुभ प्रतीक 
विश्व बंधुत्व साधू                      2

ऋतू  वसंत आगमन
दिसे चैत्र  पालवी
आठवु  राम विजयाला
मनी मोद खुलवी                         3

प्रसंग आहे फार बाका
उजवुया सणाला
आरोग्याची घेत काळजी
पाळत नियमाला                          4

जाणुनिया सण मांगल्य
जपुया परंपरा
*गुढी उभारु मांगल्याची
 सुखी   होईल धरा                           5

वैशाली वर्तक 
अहमदाबाद 
13/4/2021


*मना मनातील गुढीपाडवा*

आला सण पाडव्याचा
येते मनी  गीतरामायण
गाणी रामाची म्हणूनीया
करुया  त्याचे पारायण

बांधू गुढी उंच नभी
कडुनिंब, गाठी गोड
दावू प्रसाद तियेला
करुनिया गोड धोड

ऋतू वसंतात सृष्टी
बहरली सौंदर्याने
निहाळुया रुप तिचे
स्मरू देवाला नेमाने

सारे बांधव भुमीचे
विश्व बंधु भाव मनी
पाळू, धर्म मानवता
 खरे हे , मर्म जीवनी

गुढी बांधू आरोग्याची
घेवू काळजी स्वतःची
टाळू ठिकाण गर्दीची
महामारी पळेल दूरची


वैशाली वर्तक 
अहमदाबाद






**गुढी प्रेमाची**
  आला सण पाडव्याचा
  लावू गुढी समतेची
  दूर सारु जाती भेद
  **गुढी उभारु प्रेमाची**

   विसरुनी राग द्वेष
  मनी भरु प्रेम भाव
  जसे होते रामराज्यी
   नसे सुखाचा अभाव

   स्वच्छ ठेवण्या भारत
   करु निर्धार मनाचा
  पळवून कोरोनाला
   क्षण आणू आनंदाचा

  बांधू  तोरण आंब्याचे
  दारी रेखुया रांगोळी
  सौख्य नांदो घरोघरी
  काढू शुभेच्छांच्या ओळी.

  जग सुखी सारे होवो
  हेच मागणे देवास
 पूर्ण  होवोत कामना
  दूर कर कोरोनास

  ध्येय ठेवू सदा उंच
  मुखी ठेवूनी गोडवा
  जपू संस्कार संस्कृती 
  आला सण हा पाडवा

 ......वैशाली वर्तक.....23/3/2020
   

अभाम साप ठाणे जिल्हा 2
आयोजित उपक्रम
विषय.. मराठी नववर्ष (गुढीपाडवा)

करू स्वागत नववर्षाचे
बांधू गुढी मांगल्याची
सण आला पाडव्याचा
नव ऊषा आली उत्कर्षाची.

धरा बहरली पाना फुलांनी
दिसे सर्वत्रची हिरवळ
वसंत ऋतू दावी रुप अनोखे
 झटकूया मनीची मरगळ

 विसरुनी राग द्वेष
  मनी भरु प्रेम भाव
  जसे होते रामराज्यी
   नव्हता सुखाचा अभाव..


  बांधू  तोरण आंब्याचे
  दारी रेखुया रांगोळी
  सौख्य नांदो घरोघरी
  काढू शुभेच्छांच्या ओळी.

  जग सुखी सारे होवो
  हेच मागणे देवास
 पूर्ण  होवोत कामना
  लाभो विश्व शांती जगास

  ध्येय ठेवू सदा उंच
  मुखी ठेवूनी गोडवा
  जपू संस्कार संस्कृती 
  आला सण हा पाडवा.

वैशाली वर्तक
अहमदाबाद

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

कष्टाचे चीज

कष्टाचे चीज      खरच त्यावेळी कापड गिरण्या जोरात चालायच्या.व नोक-या पण  मिळत होत्या.. जे कष्ट करण्यास तयार होते.त्यांना कष्ट करुन खरच शुन्या...