पितृपक्ष
संस्कृतीत आपुल्या
पितरांना स्मरण्याचा
पंधरा दिसांचा पितृपक्ष
श्रध्दांजली अर्पण्याचा
भाद्रपद महिन्यात
सुरु होतो पितृपक्ष
पितरांना मान देण्या
काक स्पर्शाकडे देती लक्ष
पितृपक्षी मान पूर्वजांना
पूजन करुनी आठवण
पितृपक्षी जेवण घाली
मनी कृपेची साठवण
दिवंगत पूर्वजांचे
पिंडदान पूजनाने
श्राध्दविधी पितृपक्षी
शांति मिळते स्मरणाने
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा