सिध्द साहित्यिका समूह
अष्टाक्षरी काव्य रचना
विषय- माझी जीवलग सखी
माझी जीवलग सखी
नसेकोणीही दुसरी
असे ती सदा देखणी
पहा कशी ती हासरी
भाव मनीचे उमजे
किती तिजला सहज
काही न सांगता कळे
वाच्यतेची न गरज
तिच्या संगे राहण्याचा
छंद जडला जिवाला
तिच्या मुळे दिन कसा
देतो आनंद मनाला
सेवा घडवी देवीची
मला तिचा सदा मान
सदा बहरत राहो
वाटे वाढो तिची शान
कधी तरी रुसलेली
नाही वाटे मज बरे
मन धरणीत दिन
जातो दिन हेच खरे
वैशाली वर्तक
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा