रविवार, ६ सप्टेंबर, २०२०

देवा तू कुंभार

यारिया साहित्य  समुह  
**देवा तू कुंभार*

षडाक्षरी

कुंभार  घडवी
मडकी वेगळी
तू घडवी व्यक्ती 
रोजच आगळी

किती घडविशी 
 व्यक्ती माठ नित्य 
किती तोडीशी हे
रोज असे सत्य 

कसा जमविशी
हा नित्य  पसारा
असे अभिनव 
खेळ तुझा न्यारा

तूची घडविली
अवनी सुंदर 
तयात रचली
सृष्टी  मनोहर

तू देवा कुंभार
जगाचा आधार
तूची वाहे सारा
विश्वाचा तो भार

ओती तूची प्राण
साकार देहात
करणे अंत ही
तुझ्याच हातात

वैशाली वर्तक

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

सरत्या वर्षाने काय दिले

स्वप्न गंध स्पर्धा समूह आयोजित  झटपट काव्यलेखन स्पर्धा  विषय     सरत्या वर्षाने काय दिले  विचार करता मनी  काय मिळाले गत वर्षात  दिले सुख आनं...