प्रेमाची अक्षरे
झटपट अष्टाक्षरी
स्पर्धेसाठी
धुंद एकांत या क्षणी
नको दावुस बहाणे
तुला समजण्या मीही
आता झालीय शहाणे
बघ सांजवेळ झाली
घेते हाती तव हात
तुझी माझी राहो सदा
नित्य प्रेमळ ती साथ
स्मृती अजुनी आहेत
ताज्या समुद्र तटीच्या
गाज तयाची सांगते
आठवणी अंतरीच्या
राहो अशाचअपुल्या
ऋणानुबंधाच्या गाठी
ओढ राहील सदाची
स्नेह सदानंदा साठी
हेच मागणे देवास
अशा एकांत क्षणाला
मार्ग सुखाचा चालूया
मिळो स्वर्ग सुख तुला
वैशाली वर्तक
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा