अष्टाक्षरी
विषय-- फक्त माझच आकाश
**मनीची कल्पना**
होते पहात नभाला
तरंगत होते पक्षी
काय सुंदर दिसली
मनोहर भासे नक्षी
मनी वाटले क्षणात
उंच मारावी भरारी
घेत कवेत आकाश
मनी भरली उभारी
छंद जोपासावे सदा
घ्यावी लेखणी हातात
तिच्या व्दारे साधावित
सारे सारे जीवनात
सारे आकाश माझेच
चंद्र तारे प्रकाशात
मनी करीत कल्पना
विहरले गगनात
किती सुंदर लेखणी
तीने दाविले मनात
फक्त माझेच आकाश
छान झोपले क्षणात
वैशाली वर्तक
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा