प्रित तुझी नि माझी आयोजित
कथा विषय- प्रेयसीला बायकोत बघा
प्रेयसी ला बायकोत बघा
विनय व सरला दोघांचे मस्त सहजीवन चालू होते .संसार अगदी सुखाने बहरला होता. अगदी चौकोने कुटुंब होते. एक मुलगा व एक मुलगी. मोठा मुलगा व लहान मुलगी. पोरे पण गोड गुणी होती.
"घरात हसरे तारे असता
मी पाहू कशाला नभाकडे"
हे गाणे ती नेहमीच गुणगुणत असायची.
विनय काॕरपोरेट कंपनीत सर्वीसला होता. पगार पण छानच व्यवस्थित होता. सरला पण शिकलेली होती, पण तिने घराकडे, मुलांकडे लक्ष रहावे म्हणून work from home म्हणतात ना तसे घरुनच काम करत होती. एकूण काय सुखात संसार चालला होता.
घरचे , बाहेरचे... आॕफीस काम ...मुलांचे पहाण्यात सरलाची फार दमछाट व्हायची. कधी कधी ती वैतागायची. विनय आॕफीस मधून आला तरी आॕफीस कामात ती गर्क राहायची.
चला , बाहेर जाउया कुठे म्हटले तर नाही म्हणायची. माझे आॕफीस काम राहिलय पूर्ण करते. मग काय.. तर आता जेवणाचे पहाते.. करत थकून झोपायची .
विनयला समजत होते. तो पण मदत करायचा नाही असे नव्हते... तरी त्याला जे वाटे की, हिने थोडा वेळ सांजवेळी एकत्र बसावे. इकडच्या तिकडच्या गप्पा कराव्यात. स्वतःचे व त्याचे मन हलके करावे . कारण सांजवेळी मुले मैदानात खेळायला गेलेली असता. तिने पण कामाचा व्याप बाजुस सारुन जरा बसावे .
तशी सरला मुले खेळून येताच शुभं करोति म्हणून घेऊन ,देवाचा दिवा लावणे ,सर्व व्यवस्थित करत होती. घरच्या कामात सदा व्यवस्थित पणा होताच.
असाच एकदा विनय बसला असता त्याला आॕफिस कलीगचा फोन आला. फोन वर गप्पा झाल्या. फोन झाल्यावर जेवणे आटपली. विनय म्हणाला," ही नवीन मुलगी आफीसमधे आली आहे. फार बोलकी आहे सोज्वळ पण आहे, हुशार आहे. सरला सर्व ऐकत होती .
सरला म्हणाली ,"हो का? अरे वा . नाव काय म्हणालास .
विनय म्हणाला, राधिका.
सरला म्हणाली , " छान नाव आहे.
अशाच एका रविवारी
विनय म्हणाला ," चला रविवारी आहे.. माॕलमधे खरेदीला जाऊ. तुझे , तसेच मुलांच्या कपड्याची खरेदी करु. ."
सरला म्हणाली ," मुलांची करु मला काही नको. अशी पण work from home करते. कपड्यांची इतकी गरज नसते. आणि आताच काही दिवसापूर्वी तर तुम्ही मला दोन ड्रेस आणलेत. आता कशाला उगाच खर्च . वाटले तर तुमच्या साठी नक्कीच घेऊया. "
असेच दिवस जात होते. आॕफीस कलीग राधिका आता आॕफिसात छान रुळली होती. दिवासाचा 8 तासाचा सहवास असायचा. ती छान तयार होऊन यायची . सहाजिक सर्वच स्टाफची नजर तिच्याकडे जायची. आणि , खरच ती टापटीप व खास तर , कुठे ही उडते वा उत्शृंखल कपडे नसायचे.
सहज विनयने तिला म्हणाला ," वा छान ड्रेस आहे आजचा . .नवा दिसतोय.!
ती लगेच म्हणाली, " हो .
विनय म्हणाला ," एक काम करशील.असाच याच रंगात एक ड्रेस घेऊन येशील का उद्या. ."
ती कलीग राधिका म्हणाली ," येईन की.. माप काय.
विनय म्हणाला ,"अगदी सेम मापाचा. त्याला अंदाज होताच.
दुस-या दिवशी तिने ड्रेस आणून पण दिला.
विनय ड्रेस घेऊन आॕफीसातून घरी आला.व सरलाच्या हाती दिला ,व म्हणाला ,"कसा आहे ड्रेस ? आवडला. ?
ती म्हणाली ,"हो छानच आहे. न आवडण्या सारखे काहीच नाही. आणि तुमचे सिलेकशन छानच असते. "
विनय बोलला," हो ते तर आहेच.म्हणून तर तुला पसंद केली .तेच माझ्या उत्तम सिलेकशनचे उदाहरण आहे. "
सरला पण हसली .मनी खूश झाली. तिला खूश पाहून
तो पण खूश झाला.
असेच एकदा नवरात्री जवळ आली होती. वनरात्रीत नऊ दिवस नऊ वेगळ्या रंगाचे कपडे परिधान करण्याचे हल्ली फारच खूळ सुरु झालय. तर दर रोजच्या वेगळ्या रंगा प्रमाणे मॕचींग कानातले गळ्यातल्याची खरेदी करावी असे विनयला वाटले
सहज तो राधिकाला म्हणाला ," तू आज माझ्या बरोबर काही इमिटेशन ज्वेलरी घ्यायची आहेत. तर येशील का? ती तयार झाली. तिने दुकान, बाजार दाखवून योग्य ठिकाण हून दोघांनी खरेदी केली. तसा कलीगचा राधिकेचा पण चाॕईस छानच होता. नेहमी तिच्या अंगावर कपडे, काना गळ्यात तिला उठेल असेच घालायची.
विनया घराच्या राम रगाड्यातून वरच येत नव्हती. पण विनय ने आणलेल्या वस्तू आवडत पण होत्या खूश पण होत होती.
असेच दिवस जात होते. सहज नवरात्रीचे दिवस जवळ आले होते.
एक दिवशी आॕफीस कलीग राधिका विनयच्या घरी तिच्या मैत्रीणीला घेऊन ,रात्री त्यांच्या सोसायटी चे गरबे पहावयास आली.
त्या दिवशी तिने विनयने आणायला सांगितलेला ड्रेस व विनय बरोबर घेतलेली कानातली, गळ्यातली घालून ती आली होती.
सरला पहाताच राहिली ,म्हणाली .," अरे माझ्या कडे असाच ड्रेस व अशीच ईमिटेशन ज्वेलरी आहे.
तर ,राधिका लगेच म्हणाली ,"हो असणारच.मीच होते बरोबर खरेदी कराताना.
रात्री विनय च्या कुशीत सरला जवळ गेली.
म्हणाली," विनय ,मी घर कामात उगाच इतकी व्यस्त रहाते. माझी चूक झाली मी घरकामाचा या सर्व कामाचा फारच बाऊ करुन घेत आहे. व जीवनातील आनंदाच्या क्षणांना मुकत होते खरच तू मला त्या आनंदी क्षणांची सहजच आठवण करुन दिली. . sorry विनय
विनय म्हणाला , "नाही. मी आमच्या कलीग मधे तुलाच पहात होतो. म्हणून मी खरेदी करुन आणत होतो. तुला वेळच
नव्हता. पण मला माझे सौंदर्य तर पहायचे होते ना!खुलवायचे व खुललेले सतत ठेवायचे ना. "
खरच विनय, तू खरच खूप नावाप्रमाणे समजूत दार आहेस.
विनय व सरला समाधान नजरेने ऐकमेकांकडे पहात हसले.
वैशाली वर्तक
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा