मोहरली लेखणी
चित्र काव्य लेखन
शीर्षक -- *युग पुरुष*
देवकीचा पुत्र आठवा
वाढला नंद- यशोदे घरी
खोडकर भारी नंदलाला
दह्या दुधाच्या चो-या करी
सदा बासरी अधरी
गोड वाजवी बासरी
सूर ऐकता तियेचे
राधा होतसे बावरी
वेड लावी सूर जीवांना
राधे संग खेळ खेळी कान्हा
पक्षी पण होती मंत्र मुग्ध
गाईंना फुटे प्रेमे पान्हा
द्रौपदीचा असे तो सखा
धावा करी ती संकटाला
त्वरित येई धावत हरि
सदा तत्पर तिच्या रक्षणाला
दिधले बोधामृत गीतेतूनी
जीवन सार दिले जगताला
अर्जुनाचा सारथी राहूनी
रणांगणी दूर केले अज्ञानाला
मूर्ती मंत प्रेम राधे कृष्णाचे
ख-या भक्तीचे ते प्रतिक
अव्दैताचा आत्मा एकरुप
असे प्रेम तयांचे सात्त्विक
वैशाली वर्तक
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा