एकांत हा कधी तरी हवाच.
अगदी योग्य कथन आहे . आपण जीवन भर रोजच्या दिनचर्येत
धावतच असतो. एक संपले की दुसरे निरंतर काम चालत असते. आधी नवा संसार
नवी माणसे , त्याच्याशी मिळते जुळते घेण्यात. संसारात रुळण्यास जीवन सदा व्यतीत होत असते . अर्थात हे फक्त बायकांनाच लागू असे नव्हे तर पुरुषांचे पण तसेच जीवन धावपळीचे ..चालू असते. संसारात क्षणाक्षणाला कार्यरत राहावे लागते.
या धावपळीच्या जीवनावरुन एक english कवितेची ओळ आठविली ...
what is this life full of care
there is no time to stand & stare..
असे धावपळीत जीवन जगतअसतो. नुसती उद्या ची चिंता . काळजी वहात जगतो.आजुबाजुचे निसर्ग सौंदय पहायला पण वेळ नसतो.
आणि त्या काळात त्याचे दुःख वा खंत वा आळस वा थकवा पण जाणवत नाही. पण आमुक एका वेळी वाटते फार धावलो आता जरा एकांतात बसू काही मनन चिंतन करावे.
आपल्या स्वतःच्या आवडी निवडीचा विचार करावा. ज्या गोष्टी आपण वेळे अभावी वा आर्थिक कारणाने नाही करु शकलो. त्या आता निवांत वेळ काढून सवयी वा छंद जोपासावे. आणि खरच तसा एकांत मिळाला तर तो प्रत्येकाला हवा असतो व गरजेचा असतो.
अर्थात हल्लीच्या जनरेशनला हा प्रश्न खास नाही .कारण वैचारिक आर्थिक दृष्टीने त्यांना सुकाळ आहे. आपण आपली space ते जपत आहे. . आम्हाला स्पेस हे शब्द आमच्या तरी जनरेशनला माहित नव्हते. पण तरी देखिल कितीही स्पेस मिळवली तरी स्वतःसाठी .. त्यांना ही एक वेळ येईलच की एकांत हा
शोधतील .
तर या एकांतची गरज प्रत्येकास असते . आता हा एकांत कसा उपभोगायचा हा ज्याचा प्रश्न पण एकांताची गरज मात्र मुळभूता प्रश्न आहेच
वैशाली वर्तक
एकांत..
देतो जीवाला मनःशांती
एकांत क्षण आवडे सदाकाळ
सुरु होते दिन चर्या
जसे होताची सकाळ
हवा हवासा वाटे मनाला
प्रत्येकाला तो एकांत
आठवणीत रमणे आवडे
पण, म्हणून हवा तो निवांत
मिळवता ज्ञान सिद्धी
एकांत चित्ताला असतो हवा
सारे विसरूनी होण्या एकचित्त
एकाग्रता देते विचार नवा
एकांत हवा वाटे नव युगलांना
दोघांच्यात सदा रामण्यास
अडचण वाटे तिसरा
क्षणिक सुखाचा आनंद मिळवण्यास
रोजच्या धकाधकीच्या जीवनी
मिळवावा लागतो निवांत
तोच तर झालाय फार महाग
मग कुठला मिळणार एकांत
वैशाली वर्तक
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा