बुधवार, ५ ऑगस्ट, २०२०

काळ्या मातीत मातीत ...अष्टाक्षरी

शब्द रजनी साहित्य  समुह
विषय--- काळ्या मातीत 
अष्टाक्षरी

कष्ट करुनी उन्हात
काळ्या मातीला कसून 
नांगरली काळी माती
घाम तयात गाळून

पडताच मृग धारा
काळी माती तृप्त झाली
शेतकरी मनी खुश 
दाणे मोती खाऊ घाली

बरसता वर्षा धारा
काळी माती ओली  चिंब 
थेंब मुरता मातीत
उभारुन आले कोंब

कोंबातून डोकवती
छोटी छोटी दोन पान
वा-यासंगे देती टाळी
आनंदाने गात गान

बीज अंकुरे अंकुरे
ईवलीशी पहा रोप
नभाकडे पहाताती
देण्या मातीला निरोप

वैशाली वर्तक

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

सरत्या वर्षाने काय दिले

स्वप्न गंध स्पर्धा समूह आयोजित  झटपट काव्यलेखन स्पर्धा  विषय     सरत्या वर्षाने काय दिले  विचार करता मनी  काय मिळाले गत वर्षात  दिले सुख आनं...