काही प्रश्नांची उत्तरे
पडतात क्षणोक्षणी
मनी प्रश्न सदा काळ
कसे मिळवू उत्तर
मनी प्रश्नांचीच माळ
पहा कसे खेळे भाग्य
जन्म वेळ ती समान
भाग्यवान ठरे कुणी
कोणी नशीबे लहान
दुष्ट लोका सुख मिळे
नसे दुःख तया कदा
तर सज्जनांना मात्र
सहताती कष्ट सदा
किती सांगे संतवाणी
समाधान ठेवा मनी
हव्यासाची खोड मात्र
जात नाही हर क्षणी
जाणारही रिक्त हस्ते
मग का हव्यास धरी
किती ते कमवणार
मनी सीमा बांध तरी.
पितृपक्षी येतो ऊत
पितरांचे पिंड दान
काकस्पर्श होताचिया
कसे मिळे मोक्ष स्थान
अशी असती प्रश्ने ती
ज्यांची नसेच उत्तर
रहातात काही प्रश्ने
सदा साठी निरुत्तर
वैशाली वर्तक 30/9/2019
पडतात क्षणोक्षणी
मनी प्रश्न सदा काळ
कसे मिळवू उत्तर
मनी प्रश्नांचीच माळ
पहा कसे खेळे भाग्य
जन्म वेळ ती समान
भाग्यवान ठरे कुणी
कोणी नशीबे लहान
दुष्ट लोका सुख मिळे
नसे दुःख तया कदा
तर सज्जनांना मात्र
सहताती कष्ट सदा
किती सांगे संतवाणी
समाधान ठेवा मनी
हव्यासाची खोड मात्र
जात नाही हर क्षणी
जाणारही रिक्त हस्ते
मग का हव्यास धरी
किती ते कमवणार
मनी सीमा बांध तरी.
पितृपक्षी येतो ऊत
पितरांचे पिंड दान
काकस्पर्श होताचिया
कसे मिळे मोक्ष स्थान
अशी असती प्रश्ने ती
ज्यांची नसेच उत्तर
रहातात काही प्रश्ने
सदा साठी निरुत्तर
वैशाली वर्तक 30/9/2019
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा