शनिवार, ५ ऑक्टोबर, २०१९

भ्रमर अभंग

कला साहित्य प्रेमी यात्री
साहित्य कला यात्री महाराष्ट्र राज्य स्तरीय
अभंग स्पर्धा
विषय -- भ्रमर             1/10/2019
भ्रमर
वेडा हा मिलींद । गुंजनात गुंग ।
सदा राही दंग । भ्रमरतो ।l 1
दिसता कमल । विसरतो भान।
सेवनात ध्यान । सदाचिया ll 2
झाली सांज वेळ । कमला समीप।
लागले ते दीप । चोहीकडे ll 3
मिटताच दल । होई बंदी भृंग।
राहिलाची दंग । सेवनात ll 4
खर पहाताच l नसे ते अशक्य. I
सहजची शक्य l छेदणे ते ll 5
छेद कमळास । परि न करितो l
प्रेमेची स्मरतो । पंकजास ll 6
जगतासी ज्ञान ! ! नकोच आसक्ती
मोहाची विरक्ती ! वदे वैशू ।l 7
वैशाली वर्तक 1/10/2019




हुरहूर ,गात्र,  तृप्त  ,रेशीम स्पर्श प्रीत

वाट पाही भृंग ! सदाची काहूर !
मनी हुरहूर ! मिलनाची

उमले कमल ! सदा राही दंग !
गुंजनात गुंग ! भ्रमर हा !!

तृप्त होई मन ! गात्र गात्र शांत !
रेशमी स्पर्शात ! भ्रमराचे !!

होता चांदरात ! विसरतो भान !
सेवनात ध्यान ! सदाचिया !!

खरे पहाताच ! नसे ते अशक्य !
सहजची शक्य ! छेदण्यास !!

न करिता छेद ! जाणितो तो प्रीत !
प्रीतीची ती रीत ! प्रेमीच तो !!

होता तृप्त ओठ ! मिलनाची आस ! 
संपवितो ध्यास ! तृप्त मने !!


वैशाली वर्तक 






कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

सरत्या वर्षाने काय दिले

स्वप्न गंध स्पर्धा समूह आयोजित  झटपट काव्यलेखन स्पर्धा  विषय     सरत्या वर्षाने काय दिले  विचार करता मनी  काय मिळाले गत वर्षात  दिले सुख आनं...