गुरुवार, १० ऑक्टोबर, २०१९
गणेश उत्सव
गणेश हे सर्वांचेच आराध्य दैवत आहे. अगदी जैन धर्मात पण गणपती पूजन
असते .शुभ कार्य म्हटले की जैन लोकात पण गणपती पूजन असतेच. कारण गणेश आहेच दुःखहर्ता विध्न हर्ता. म्हणूनच त्याची आठवण होणे सहाजिक आहे. म्हणून तर त्याचे वर्णन पण
तू सुखकर्ता तू दुःख हर्ता
विध्न विनाशक मोरया
संकट रक्षी शरण तुला मी
गणपती बाप्पा मोरया
असे म्हणून करतात.
भाद्रपद महिन्याच्या शुल्क पक्षातील चतुर्थीला गणेश उत्सव साजरा करतात.
आता प्रमाणे च पूर्वी पासून घरा घरातून ..गणेश मूर्ती स्थापन करणे.. पूजन करणे... .विधी वत त्याचे आगमन करणे व आनंदाने उत्साहात साजरा करणे चालतेच. आपणा सर्वांना माहीतच आहे .स्वातंत्र्य मिळण्या आधी यालाच टिळकांनी सार्वजनिक स्वरुप दिले .स्वातंत्र्य प्राप्ती साठी जन जागृती करण्या साठी , लोक उत्सवा निमीत्य एकत्रित होतातच तर त्यातच जन जागृती करण्या हेतू ने त्यास सार्वजनिक स्वरुप दिले. व सार्वजनिक गणेश उत्सव सुरु झाले.
सुंदर भाषणे ....राजकीय किर्तने करुन लोकांच्या मनामनातून जन जागृती केली.
स्वातंत्र्य प्राप्ती नंतर पण तोच उत्सव साजरा होत होता. वेगवेगळ्या शहराच्या विभागात ,सोसायटीतून गणेश उत्सव तसेच चालूच राहिले. कधी किर्तन तर कधी चर्चा ..तर कधी वकृत्व स्पर्धा .तर कधी एकांकीका. .तर कितीदा स्थानिक
हौशी कलाकारांचे कार्यक्रम ठेवण्यात येत होते व अजून पण होतात . की ज्यामुळे उद्या चे भावी कलाकार कलावंत तयार होतात. मुलांचे व्यासपीठावर येणे ..बोलणे व व्यक्त होणे...यातून बरेच शिकावयास मिळते .सभाधारिष्ट पणा येतो. व आंतरिक गुणांच्या प्रर्दशनास वाव मिळतो.
पण आता त्याचे स्वरूप पालटले आहे.आज काल गल्लो गल्ली मंडळे स्थापून .गणेश उत्सव चालतात. त्यात भक्तीचे रुप कमी .दिखावा फार . अगदी मूर्ती आणण्या पासून चुरस असते.जेवढा गणपती आकारात मोठा तेवढे मंडळ मोठे ...असा काही तरी समज झाला आहे .नुसतेच आकारात गणेशाचे मोठे पण नव्हेतर सजावट .... तसेच दिव्याची रोशनाई .यात चुरस लागते .सजावटीत वापरले जाणारे ते सामान ...सारे प्रदुषणात वाढ करणारे असते. तसेच मोठ्या आवाजात माईक लावून दिवसा रात्री वाटेल ती गाणी वाजविणे. ज्या मुळे आवाजाचे पण प्रदुषण वाढते. कोणाच्या परीक्षा चालू असतात तर कोणी आजारी असते. व आणि महत्त्वाचे ..नको ती गाणी त्या बिचा-या गणपतीला कानठण्या बसतील अशा आवाजात ऐकाव्या लागतात. प्रसंग काळ वेळचे बंधनच नाही.
बिचारा तो गणपती सर्व सहन करतो.
एवढेच नव्हे तर गणपती आणतांना व विसर्जननाला मिरवणूकी काढणे... बराच वेळ नाचत बसणे...त्यामुळे रहदारी ला त्रास होतो. रहदारी अडते. सर्वच आॕफीसेसना रजा नसते.... त्यामुळे कार्यालयात पोहचण्यात ,घरी परत येण्यास अडचण, व्यत्यय येतोच. त्यात फटाके लावणे त्यामुळे पुन्हा आवाजाचे व हवेचे प्रदुषण वाढत असते.
तितकेच महत्वाचे मूर्ती ...पूर्वी शाडूच्या मातीच्या बनवायचे. आता ते परवडत
नाही . त्यामुळे कारागीर बिचारे प्लास्टर आॕफ पॕरिस च्या मूर्ती बनवितात. ज्या पाण्यात विसर्जीत होता होत नाही व दुस-या दिवशी छिन्न विछिन्न रुप मूर्तींचे दिसते. ज्यांची आपण 3वा 5 वा10 दिवस मोठ्या श्रध्देने पूजा केली असते. त्याचे असे रूप बघवत नाही .त्यामुळे शाडू मूर्ती नाही तर कायम स्वरुपाची मूर्ती बसवावी म्हणजे पाण्यात रंग मिसळणार नाही व पाण्यातील जीवांना हानी पोहचणार नाही . व पाणी जल ज्याची महती सर्वांना कळलीच आहे... .तेच जीवन आहे. त्याचे पण दुषिती करण होणार नाही. तरी आजकाल जागोजागी मोठी विसर्जन कुंडे वा हौद तयार ठेवतात. ती योग्य च आहेत. मंगल कलशाचा वापर निर्मल्यासाठी करावा जेणे करुन स्वच्छ ता अभियानकडे पण लक्ष दिले जाईल.
पूर्वी नदी ला पाणी भरपूर असायचे व इतक्या प्रमाणात गणपती
पण नसायचे .आता गणपती च्या भक्ती त वाढली आहे आणि भक्त गण वाढले आहेत. त्यामुळे विसजनात काळजी घ्यायलाच हवी.
तसेच तितकेच महत्वाचे सार्वजनिक उत्सवात दुकान दारांकडून वा व्यापा-यांकडून वा इतर पण जनांकडून बळजबरी रूपाने ,सक्तीने अथवा सारा गोळा केल्या प्रमाणे वर्गणी गोळा करतात, ते पण योग्य नाही .जमेल तेवढयात पैशात उत्सव साजरे केले पाहिजे. व लोकांच्या वर्गणी नावाने गोळा केलेल्या पैशाचा वापर व इतर दंगा मस्ती गणपती उत्सव नावाने चालते ती पण योग्य नव्हे.
भारता बाहेर पण गणेश उत्सव चालतात.त्यात शिस्तबद्ध पणा दिसतो. तो आपल्या देशात दिसला पाहिजे. उद्या च्या पीढीला छान संस्कारात्मक उत्सव स्वरुप कसे दिसेल याचा विचार केला पाहिजे.
.....वैशाली वर्तक
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
सरत्या वर्षाने काय दिले
स्वप्न गंध स्पर्धा समूह आयोजित झटपट काव्यलेखन स्पर्धा विषय सरत्या वर्षाने काय दिले विचार करता मनी काय मिळाले गत वर्षात दिले सुख आनं...
-
काव्य स्पंदन राज्य स्तरीय समूह 02 काव्य प्रकार -- अष्टाक्षरी 1 विषय -- उंच भरारी आकाशी आहे तुझ्यात कर्तृत्व घेण्या नभात भरारी दाव सामर...
-
सर्व धर्म समभाव लोकशाही साहित्य मंच आयोजित उपक्रम 348 विषय. नारळ कल्पवृक्ष स्थान फळांत मानाचे असे सदा नारळाला श्री उपपद लावून वदती ...
-
इथं इध बस ग चिऊ दाणा खा पाणी पी अन् बाळाच्या डोक्यावरून भुर्रsssकन उडून जा. असे म्हणत विभावरी बाळाला खेळवत होती. ...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा