कथे आधारित चारोळी
स्पर्धे साठी
दोघे विहरत होते फूला फूलावर
भ्रमर न् फूलपाखरु दोघे क्षणमात्रात
म्हणती मीच खरा प्रेमी फूलांचा
लागली चुरस त्या दोन मित्रात
भ्रमर न् फूलपाखरु दोघे क्षणमात्रात
म्हणती मीच खरा प्रेमी फूलांचा
लागली चुरस त्या दोन मित्रात
राम प्रहरी दिसे पाखरू ,फूला समीप
बसले पाखरु पहाटेच येऊन
सिध्द कराया तोचि खरा प्रेमी
पुष्पात बंदी भुंगा पडे निचपत होऊन
बसले पाखरु पहाटेच येऊन
सिध्द कराया तोचि खरा प्रेमी
पुष्पात बंदी भुंगा पडे निचपत होऊन
शक्य होते भ्रमरास छेदणे पुष्पास
पण प्रेम भावना पुष्पाची हृदयात
चुरस लावण्यात गमविला मित्र
दुःखी होऊनी फूलपाखरु रडे मनात.
पण प्रेम भावना पुष्पाची हृदयात
चुरस लावण्यात गमविला मित्र
दुःखी होऊनी फूलपाखरु रडे मनात.
वैशाली वर्तक 7/10/2019
'
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा