बुधवार, २५ फेब्रुवारी, २०२६

मायबाप


 माय बाप
माझे दैवत

मायबाप देवासम
किती वर्णावी महती
खूप कष्ट साहुनिया
केले महान जगती

सदा चिंता लेकरांची
मनी एक असे ध्यास
होवो मुले यशवंत 
हीच मनी सदा आस

 संस्काराचे खत पाणी 
देऊनिया केले मोठे
घडविले भवितव्य
कोठे न दिसण्या खोटे

सारूनिया हौस मौज 
सदा घडविण्या दक्ष 
पुरविले हट्ट लाड
गुणी बाळाकडे लक्ष

किती ऋण मजवरी
कधी न व्हावा विसर
फेडण्यात त्यांचे ऋण
घडो  सेवा निरंतर 

नको करू कोणा देवा
जगताती निराधार
नसे मायबाप त्यांचा
तूची असशी आधार

जया संगे मायबाप 
तेची खरे भाग्यवान 
गेल्या जन्माची  पुण्याई 
होवो सारे पुण्यवान 









कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

वृत्त बध्द चंद्रकांत\ पतितपावन कविता

फक्त वृत्त बध्द कविता उपक्रमा साठी  आशय ओळी विजोंच्या वृत्त चंद्रकांत/पतितपावन  8-8-8-2 शीर्षक. ...मंनिषा अशी दिवाळी, एके वेळीं,करित होतो कद...