शुक्रवार, १० मे, २०२४

विसावा शब्दगंध शब्द मे2024



 विसावा 


जीवा ,जरुरी विसावा 

वाटे  तो  हवा हवासा 

काम चाले अविरत 

 मनी देतसे दिलासा.  


सुख, शांति मिळविता

क्षणभर न उसंत 

नाही मिळाला निवांत    

मनी राही सदा खंत


कर्तव्याच्या, पठडीत

 सदा राही रममाण 

घर, गृहस्थी पाहण्या

दिले ,झोकूsssन बेभान.



शमवून तप्त रश्मी 

 रवि जातसे अस्ताला

 अवनीच्या तो कुशीत 

 जाई जणु विसाव्याला.


आयुष्याच्या. ... सायंकाळी 

आता जगु स्वतः साठी 

नका  मानू रिक्त पण  

 आयु असता ते गाठी


इच्छा  आकांक्षा व स्वप्ने 

यांची करु फुलवात

मिळुनिया तेजाळुया

स्वर्णांकित सांजवात



वैशाली वर्तक




जीवाला विसावा /वाटे  तो हवासा /देतसे दिलासा.  /सदा मना


सुखासाठी धावे//   नसते उसंत /मनी सदा खंत/ दिनभर

कर्तव्यात दक्ष/कामी रममाण/होऊनी बेभान/गृहस्थीत


शमवून रश्मी/ आदित्य अस्ताला/जातो विसाव्याला/सांजवेळी 


झाली बघ सांज/जगु स्वत:साठी/आयुष्य ते गाठी/ असताना




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

कष्टाचे चीज

कष्टाचे चीज      खरच त्यावेळी कापड गिरण्या जोरात चालायच्या.व नोक-या पण  मिळत होत्या.. जे कष्ट करण्यास तयार होते.त्यांना कष्ट करुन खरच शुन्या...