शब्द प्रेमी विश्व शब्दांचे
आयोजित उपक्रम
चित्र चारोळी लेखन
13/3/23
सांजवेळी
मुलांच्या समवेत आई
दिवा लावून देवाला
सांजवेळी शुभंकरोती
म्हणत जपतेय संस्काराला
श्रीकृष्ण गोविंद मुरारीने
अधरी धरली बासरी
गळा हार कटी पितांबर
लोभस मूर्ती हासरी.
किती प्रसन्नता देवा-ही
पाहता जुळती कर
भासे डोळे मिटुन
बसावे येथे क्षणभर
आहे तोची करविता
जावे त्याला शरण
शिकवण देतेय माता
करती सारे देवाला वंदन
वैशाली वर्तक
अहमदाबाद
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा