गुरुवार, ८ ऑगस्ट, २०२४

पाच वर्षे अभिमानाची

स्वप्न गंध साहित्य समूह आयोजित उपक्रम 
क्रमांक २०८
दि ८\८\२४
विषय ...पाच वर्षे अभिमानाची 
  

आहे समूह असा की
वाटे त्याचा अभिमान 
पाच वर्षे कधी झाली 
याचे न कुणाही भान

नित्य नेमाने करिती
सारे सारस्वत लिखाण 
गुज मनीचे सांगता
 विचारांचे आदानप्रदान

 संत वाणी रोज कानी
नाना मार्गे ज्ञानात भर
अमुल्य ज्ञानाचा ठेवा
 समूह असता निरंतर

 श्रेय जाते प्रणालीला
संभाळते धुरा मेहेनतीने
खरच मायभाषेची
सेवा करते निष्ठेने 

आज दिनी देऊ शुभेच्छा 
*पाच वर्षे अभिमानाची*
मिळवू अशीच ज्ञान संपदा
 मनी आस समूह जतनाची


वैशाली वर्तक 
अहमदाबाद

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

सरत्या वर्षाने काय दिले

स्वप्न गंध स्पर्धा समूह आयोजित  झटपट काव्यलेखन स्पर्धा  विषय     सरत्या वर्षाने काय दिले  विचार करता मनी  काय मिळाले गत वर्षात  दिले सुख आनं...