शनिवार, १० ऑगस्ट, २०२४

एक धागा मैत्रीचा

 अभामसाप धुळे जिल्हा 

आयोजित काव्यलेखन उपक्रम 

विषय ..एक धागा मैत्रीचा 



धागा धागा विणतो 

विणकर नित्य नेमाने 

दिन एक एक सरतो

आयुष्याचा क्रमाने 


किती येती परिचयात

व्यक्ती अगणित जीवनी

पण स्नेहाचे मैत्री नाते

सहजची जुळते मनोमनी



  राज्यपद विसरुनिया 

बालपणीची मैत्री स्मरली

कृष्णाची सुदामाशी जीवनी

जग जाहिर मैत्री ठरली


नसे माझे तुझे भाव 

मदतीला सदा तयार

मैत्रीच्या  गोड नात्यात  

स्नेहाचा भाव अपार 


योग्य वेळी योग्य सूचन

अखंड आपुलकी  केवळ

दोन तने  एक मन

अशी असते  मैत्री निखळ 


वैशाली वर्तक 

अहमदाबाद

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

कष्टाचे चीज

कष्टाचे चीज      खरच त्यावेळी कापड गिरण्या जोरात चालायच्या.व नोक-या पण  मिळत होत्या.. जे कष्ट करण्यास तयार होते.त्यांना कष्ट करुन खरच शुन्या...