बुधवार, ३१ जुलै, २०२४

मन झाले ओले चिंब


*स्पर्धेसाठी*
तृतीय वर्धापनदिन स्पर्धा 
शोध अस्तित्वाचा साहित्य समूह 
विषय...मन झाले  ओले चिंब 
मुक्त छंद प्रकार 

 शीर्षक...आभार विधात्याचे

बसले होते एकटीच
समुद्राच्या तटी
पहात होते 
सागर लाटांचा खेळ .

एका नंतर एक लाटा
येत होत्या उसळत
भेटण्या किनाऱ्याला ,

पण येताची किनारा 
लाजून चूर चूर होत 
पसरत होत्या किना-याशी 
अलगत.

खेळ पहाता पहाता 
मन रमले निसर्गात
किती देतो आपणास निसर्ग 
कुठे नदी, जलशय तर 
कुठे उंच गिरी शिखरे, पठार.

आहे सारी किमया तयाची 
आणि त्या विश्वंभराची
केली तयार अद्भुत सृष्टी 
पहा तरी किती,

वरती निळे अंबर
त्यात सूर्य, चंद्र ,तारे ग्रह महान
या विश्वंभराच्या करणीला
 कशाची नसे तोड.

विचारात मन माझे झाले 
ओले चिंब चिंब 
मनात मानीले शतदा आभार
सहजतेने जोडले गेले मम
दोन्ही कर विश्वंभरास.
मन ओले झाले चिंब 
नसतानाही पाऊस.


वैशाली वर्तक 
अहमदाबाद

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

कष्टाचे चीज

कष्टाचे चीज      खरच त्यावेळी कापड गिरण्या जोरात चालायच्या.व नोक-या पण  मिळत होत्या.. जे कष्ट करण्यास तयार होते.त्यांना कष्ट करुन खरच शुन्या...