यारिया साहित्य कला समुह आयोजित महास्पर्धा
महास्पर्धा क्र 5
विषय- माळरान
हायकू रचना
**जमला मेळ**
आवडे मज
हिंडणे माळरानी
म्हणत गाणी
ऐकता गाणी
फिरली सा-या रानी
मी अनवाणी
होते काटेरी
झाडे झुडपे फार
काटे अपार
फुले रंगीत
रानफुले सुंदर
ती मनोहर
फुले वेचली
ओंजळ ही भरली
माथी माळली
वृक्षची वृक्ष
शीतल मोठी छाया
निसर्ग माया
जमला खेळ
माळरानात वेळ
सुंदर मेळ
वैशाली वर्तक
अहमदाबाद
विश्व लेखकांचे साहित्य मंच आयोजित
उपक्रम
हायकू लेखन
1 ऋतू हिरवा
------------
ऋतू हिरवा
हवेतला गारवा
भासे बरवा.
2. पाऊस सरी
-------------------
पाऊस सरी
बरसे भूमी वरी
आस हो ऊरी
3. गंध मातीचा
-----------------------
मातीचा गंध.
फिका हो अत्तराचा
वाटे सुगंध
4 दवबिंदु
------------------
होता सकाळ
दव बिंदु भासतो
मोतीची माळ
वैशाली वर्तक
अहमदाबाद
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा