सावली प्रकाशन समूह आयोजित
उपक्रम
काव्य रचना
विषय - सैनिक
सैनिकाला देश पंचप्राण
देश प्रेम हेच तया महान
रक्षणा देशा सदा तयार
सैनिक देशाला देवा समान
लढत मरणे हेची ध्येय
देश रक्षणात वाटे अभिमान
शत्रू संगे विजय मिळवणे
तयासाठी करि स्वतः चे बलिदान
सण वा उत्सव नसे तयांना
सीमेवर सदाची दक्ष राहून
राखती आपणास सुरक्षित
अभिमान वाटे तया पाहून
सीमेवर पहारा ठेवीत
ध्यानी येता शत्रुची चाहुल
सज्ज होतो लढण्यास सैनिक
सदैव पुढे तयाचे पाऊल
मनोबल तयाचे खंबीर
देशाभिमान मनी सदोदित
एकची मनी असते आस
माझा देश राहो अबाधित
सैनिकाला माझा सलाम
कोटी प्रणाम त्याच्या कार्याला
किती ऋण असती तयाचे
मानती महान सैनिकाला
येता नैसर्गिक आपत्ती
त्वरित येती धावूनी मदतीला
असो मग भुकंप वा कोरोना
लावितो हजरी जन सेवेला
वैशाली वर्तक
अहमदाबाद (गुजरात)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा